Breaking News

*मानवता जिवंत आहे* *तापत्या उन्हात पायी अथवा मीळेल त्या साधनाने प्रवास करणाऱ्यानां एनर्जी ड्रींक वितरित*

*मानवता जिवंत आहे*


*तापत्या उन्हात पायी अथवा मीळेल त्या साधनाने प्रवास करणाऱ्यानां एनर्जी ड्रींक वितरित*


*विशेष प्रतिनिधी नागपूर*
*नागपूरकोरोना महामारी चा संपूर्ण विश्वभारत होणारा प्रकोप आणि संचारबन्दी मुळे लाखो स्थलांतरित कामगार आप आपल्या गावी परत जाण्यास पायी पायी चालत तसेच वेगवेगळ्या साधनाचा वापर करित निघाले आहेत।

उन्हाळ्यात पायी पायी चालत जात असताना भर उन्हामुळे त्यांचे हाल बेहाल होताना दिसत आहेत । अनेक स्वयंसेवी संस्था यांच्या कडून कामगार वर्ग यांना पाणी आणि इतर खाण्याच साहित्य वाटप करण्यात येत आहेत।*


*तरीही नागपुरातील समाजसेवी डॉक्टर ओमप्रकाश शेंडावरे आणि मित्र मंडळीनी मिळून त्यांच्या शरीरात ग्लूकोस ची पूर्तता करण्या करिता ओआरएस पावडर आणि ओआरएस लिक्विड वाटपाचा निर्णय करुण पांजरी टोल नाका ते पारडी नाका रोड वर पायी जाणारे आणि बस द्वारे जाणारे स्थलांतरित कामगार यांना आज दिनांक १७/०५/२०२० ला १२०० ओआरएस पाउडर आणि ३०० ओआरएस लिक्विड चा वाटप करित मानवते चे कार्य केले आहे। या कार्यक्रम मधे डॉ ओमप्रकाश शेंडावरे, डॉ प्रवीण हिंगे, डॉ नीलेश वाड़ीभस्मे, डॉ आदित्य देव, डॉ कमलेश काकड़े, डॉ प्राची शेंडे, डॉ शिल्पा चरडे, श्री आदित्य झोड़े (आदिशक्ति मेडिकल स्टोर्स) यांनी सहकार्य केले*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …