Breaking News

तीस हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहात अटक लाँकडाऊन मध्ये ही या अधिकाऱ्याची हिम्मत

तीस हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहात अटक
लाँकडाऊन मध्ये ही या अधिकाऱ्याची हिम्मत

कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे

चंद्रपूर :-आज अख्या जगात कोरोना या रोगाची लक्षणे दिसत आहे आणी सर्वात संचारबंदी .लाँकडाऊन आहे .त्यात गरिबांना असे अधिकारी लुभाळत आहेत . संबधीत अधिकारी मात्र चकाट्यातच पडले असून अस्या गरिबांना लुबाडणूक थांबता थांबेना यांची या आयु .तलाठी राजेद्र विठोबाजी अतकरे यांना लाचेच्या सापळयात रंगेहात अटक करण्यात आली असुन तक्रारदार हे मौजा ब्रम्हपुरी येथील रहीवासी असून तक्रारदार यांचे खेड मक्ता येथील ०.४३ हे.आर जमीनीवर पडलेल्या प्लॉटीग क्षेत्रफळाबाबत आदेशात झालेल्या चुकीकडे लक्ष न देता सातबारे व फेरफार करून देण्याचा कामाकरीता अतकरे, तलाठी, कार्यालय साजा क्र ४ खेड मक्ता ता. ब्रम्हपरी यांना लाच म्हणून ३०,०००/-रु. देण्याची त्यांची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांचे विरुध्द ब्रम्हपुरी येथे तक्रार दिली.
प्राप्त तक्रारीवरून दिनांक १८.०५.२०२० रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही मध्ये तडजोडीअंती २५,०००/-रु. लाचेची मागणी स्पष्ट झाल्याने तहसिल कार्यालय, ब्रम्हपुरी येथे पंचासमक्ष केलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी राजेद्र विठोबाजी अतकरे, यांना २५,०००/-रु. लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरु आहेे. 

सदरची कार्यवाही ही रश्मी नांदेडकर, पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर, राजेश दुद्दलवार, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि.नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक, अविनाश भामरे, ला.प्र.वि.चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात निलेश सुरडकर, तसेच कार्यालयीन स्टॉफ नापोकॉ.संतोष येलपूलवार, पो.कॉ,संदेश वाघमारे, नरेश नन्नावरे व चालक राहुल ठाकरे यांनी यशस्वी पार पाडली आहे.

यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी/कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.बेरेच आजही अधिकारी यांचा
लुभाळनूकीत शामियान्यात आहेत का अशीच काहीशी शंका उपस्थित होताना बोलकी बोलत आहे हे विशेष

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …