*डॉ. पोतदार यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन* *सावनेर विधानसभा क्षेत्रातील कोवीड़19 मुळे उदभवलेल्या समस्या सोडवीण्याची मागणी*

*डॉ. पोतदार यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन*

 

*सावनेर विधानसभा क्षेत्रातील कोवीड़19 मुळे उदभवलेल्या समस्या सोडवीण्याची मागणी*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी दिनेश चौरसीया*

*सावनेरकोवीड़19 च्या रोकथाम करिता सुरु असलेल्या लाँकडाऊन मुळे अनेक जिवनावश्यक तसेच शेतकरी बांधवांच्या समस्या ही दिवसेंदिवस वाढत असुन त्या समस्यांचे निराकरण करण्यात राज्य सरकार सपशेल नाकाम ठरत असल्याचा ठपका ठेवत डॉ राजीव पोतदार यांच्या नेतृत्वात वरिष्ठ भाजप नेते सोनबा मुसळे,सावनेर तालुका अध्यक्ष विजय देशमुख सह अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निवेदन सादर करुण सावनेर कळमेश्वर तालुक्यातील समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे*


*सदर निवेदनातून कापूस, तुर,हरभरा ईत्यादी शेतमालाची खरेदी शासनाव्दारे अंत्यत संथ गतीने सुरु आहे परंतू ज्या प्रमाणात हजारो शेतकऱ्यांचा माल खरेदी करणे शेष असल्यामुळे ही यंत्रना कमकुवत पडत आहे व पुढे पेरणीची वेळा जवळ येत असुन शेतकऱ्यांना त्यांच्या जवळ असलेला शेतमाल विकल्या शिवाय पैसा उपलब्ध होणार नाही त्याकरिता खरेदी केन्द्र वाढवून समस्येचे निराकरण करावे.काही शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत चे कर्ज माफ झाले परंतु काहिंना अद्याप ही लाभ मिळाला नाही अश्या अनेक शेतकऱ्यांना तात्काळ लाभ मिळावा.राशन कार्ड नसनार्यां नागरिकांना ही धान्य वाटप करणे,लाँकडाऊन मुळे बंद पडलेल्या बांधकाम कामगार ,मीस्त्री,हलबा समाज(बुनकर),नाव्ही,टेलरिंग असे अनेक व्यवसाय व कामे बंद असल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळा आली आहे अश्यांना मासिक पाच हजार रुपये सहाय्य देने,शासनाने आश्वासीत केल्याप्रमाणे दोनशे यूनीट पर्यंतचे देयक माफ करणे,शेतकरी, पालक,विद्यार्थी आदींकरिता सेतू मधून लागणारे प्रमाणात पत्रे व इतर सोई उपलब्ध करुण देने,ज्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अर्थ सहाय्य मीळाले नाही त्यांना ते तात्काळ देण्यात यावे,ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहिरी नाही त्यांना बोरींग करण्याची परवानगी देण्यात यावी,शासकीय हेड 25/15 खालील निधी रस्ते बांधन्यासाठी व इतर कामावार खर्च न करता कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केन्द्राला आधुनिक उपकरणे, तपासणी साहित्य ईत्यादी वर खर्च करण्यासाठी आरोग्य विभागास वळते करावे अश्या मागण्याचे निवेदन तहसीलदार सावनेर यांना सादर करण्यात आले तहसीलदार दिपक कारंडे यांचे अनुपस्थितीत नायब तहसीलदार चैताली दराडे यांनी निवेदन स्विकारुन शिष्टमंडळाच्या भावना जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्यात येण्याचे आश्वासीत केले.*
*याप्रसंगी वरिष्ठ भाजप नेते रामराव मोवाडे,भाजप शहर अध्यक्ष मंधार मंगळे,तालुका भाजप ओबीसी अध्यक्ष सोनू नवधिंगे,नगरसेवक तुषार उमाटे,रविंद्र ठाकूर,देविदास मदनकर,अशोक तांदुळकर,अभिषेख गहरवार,दिगांबर सुरतकर,पुरषोत्तम नागपुरकर,सुरेन्द्र शेंडे,किशोर मुसळे,रविंद्र जाधव,ज्ञानेश्वर खंडाळ आदी प्रामुख्याने उपस्थित होते*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …