Breaking News

*गडचिरोली:राखीव विलगीकरण कक्षाकरीता सिरोंचा,एटापल्ली व चामोर्शी तालुक्यातील इमारती अधिग्रहीत*

*गडचिरोली:राखीव विलगीकरण कक्षाकरीता सिरोंचा,एटापल्ली व चामोर्शी तालुक्यातील इमारती अधिग्रहीत*

 

गढ़चिरोली प्रतिनिधि-सूरज कुकुडकर

गडचिरोली: राज्यात करोना विषाणूमुळे (Covid-19) उद्भवलेल्या संसंर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी, गडचिरोली साथरोग अधिनियमाच्या खंड 2 (1) नुसार सक्षम प्राधिकारी म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील करोना विषाणूंचा संशयबाधित रुग्ण आढळल्यास त्यावर नियंत्रण होण्यास्तव अश्या संशयबाधित लोकांचे विलगीकरण करणेसाठी याद्वारे राखीव विलगीकरण कक्षाकरीता सिरोंचा,एटापल्ली व चामोर्शी तालुक्यातील इमारती अधिग्रहीत करीत आहे. अधिग्रहीत केलेल्या इमारतीमध्ये आवश्यक त्या वैद्यकीय सोयी सुविधा पुरविण्यात यावेत.
सिरोंचा तालुक्यातील मुलींचे वसतीगृह, सिरोंचा मॉडेल इंग्लिश स्कुल, सिरोंचा, शासकीय अनु.जाती (नवबौद्ध) मुलींची शाळा, सिरोंचा, श्रीनिवास हायस्कुल अंकिसा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, सिरोंचा, शासकीय आश्रम शाळा बामणी, शासकीय आश्रम शाळा, सिरोंचा, भगवंतराव आश्रम शाळा आसरअल्ली, एटापल्ली तालुक्यातील आदिवासी मुलींचे वस्तीगृह, एटापल्ली, आदिवासी मुलांचे वस्तीगृह, एटापल्ली, औद्योगिक प्रशिक्षण संस्था वस्तीगृह, एटापल्ली, तसेच चामोर्शी तालुक्यातील शिवाजी महाविद्यालय, चामोर्शी, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय,आष्टी, एस.चंद्रा महिला महाविद्यालय, आष्टी याप्रमाणे इमारती अधिग्रहीत करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण दीपक सिंगला यांनी कळविले आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …