*हजारोच्या नोटा रस्त्यावर पडल्यात… पण उचलायला कोणी तयार नाही.*

*विशेष प्रतिनिधी काटोल*
*काटोलः आज सकाळी 9-10 वाजता च्या सुमारास काटोल तारबाजारातील अर्चना ब्युटी सेंटर या दुकाना समोर रस्त्यावरती नागरिकांना 500-200 व 100 च्या नोटा एकूण अंदाजे जवळपास 2000 ते 2500 रूपये अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या, नागरिकांनी त्या नोटा उचलून खिशात न ठेवता गोळा करुन रस्त्याच्या बाजूला पॉलिथिनमधे तशाच ठेवल्या, मी त्या ठिकाणी आलो असता नागरिकांची गर्दी दिसली, चौकशी केली असता सदर बाब समाजसेवी दिनेश निंबूळकर यांच्या लक्षात आली. लागलीच व्यापारी संघटनेचे पदाधिकारी संदीपजी भुतडा तिथे आले, आम्ही पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली, पोलिस कॉनस्टेबल सुनिल कोकाटे लागलीच तिथे आलेत त्यांनी त्या नोटा आपल्या ताब्यात घेतल्या. यावरुन एक गोष्ट लक्षात येते की, कोरोनाची दहशद नागरिकांमधे एवढी प्रचंड आहे की, आता रस्त्यावर पडलेल्या नोटा देखील उचलायला नागरिक घाबरु पहात आहे एकप्रकारे जणू प्रामाणिकपणाची शिकवणच आपल्या सर्वांना कोरोना देवून जात आहे…*
Maharashtra News Media सच की आवाज