चंद्रपुर बुरूड कामगाराना तात्काळ निस्तार बांबू पुरवठा करण्या बाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले

कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपना – विविध प्रकारचे शेतकरी /शेतमजूर नागरीकांना सोइसुविद्दा उपलब्ध करण्यासाठी येथील
बुरडकामगांराना हिरवा बांबू देण्यात यावे अशी मागणी येथील आयु .संतोष नरसिंहराव* *पटकोटवार माजी ग्राम पंचायत सदस्य मु, पो, गडचांदूर ता :- कोरपना जी, चंद्रपूर यानी येथील आज जिल्हाधिकारी साहेब यांना बुरडकामगांराना हिवरा बांबू मिळण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले आहे .
महोदय, सविनय निवेदन सादर करण्यात येत आहे की चंद्रपूर जिल्ह्यात कोठारी, कोरपना, गडचांदुर, तोहोगाव, या ठिकाणी हिरव्या बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करून आपल्या कुटुंबातील सदस्यांचे पालन पोषण करण्याचे काम बूरूड कामगार करीत आहे परंतु त्यासाठी लागणारा मुख्य साधन म्हणजे हिरवा बांबू होय, शासना मार्फत दरवर्षी प्रती कार्डधारकांना एक हजार पाचशे नग हिरवा बांबू पुरवठा करणे बंधनकारक असताना वनविभाग बांबू पुरवठा करण्यास अपयशी ठरत आहे, यामुळे बूरूड कामगाराना दारिद्रयाचे जीवन जगावे लागत आहे ,जवळ जवळ एक वर्ष पुर्ण झाला परंतू अद्याप हिरवा बांबूचा पुरवठा वनविभागाने केलेला नसल्यामुळे बुरुड कामगारांना मोठ्या बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, महोदय, साहेब आपली एक चुक बूरुडकामगाराना भविष्यात उपासमारीचे कारण बनू शकते ,समोर पावसाळा येत आहे नंतर वाहतूक ठप्प असते तरी पावसाळ्या आधी कोठारी, 10,000नग बांबू, कोरपना, 30,000नग बांबू ,तोहोगाव 10,000 हजार नग बांबू, गडचांदुर 10,000 हजार नग हिरवा बांबू पुरवठा करण्याचा धाडस आपन करावे व बूरूड कामगारांसमोरील उदरनिर्वाहाचा प्रश्न दूर करण्यात यावा, हीच आपनास सर्व बूरूड कामगारां कडून कडकडीची विनंती, येथील बुरडकामगांराना समाज यांच्या तफेँ सरचिटणीस बुरड समाज संघटना कोरपना तालुका संतोष पटकोटवार यांनी निवेदना द्वारे करण्यात आले आहे
Maharashtra News Media सच की आवाज