Breaking News

*दुग्ध उत्पादक शेतकर्यांवर अन्याय करु नका* -नितीन राठी *मुख्यमंत्री म. राज्य , मुंबई यांना निवेदनातून मागणी*

*दुग्ध उत्पादक शेतकर्यांवर अन्याय करु नका* –नितीन राठी

*मुख्यमंत्री म. राज्य , मुंबई यांना निवेदनातून मागणी*

मुख्य संपादक- किशोर ढूंढेले
सावनेरः महाराष्ट्रात दूध उत्पादकाकडन अनेक मार्ग़ाने दुध ख़रेदी केल्या जात आहे.त्यापैकी शासनाच्या अखत्यारित असलेल्या दुध संघाचाही समावेश आहे.सर्वसाधारण पणे दुध संघ जो भाव देतो बाक़ी दुध ख़रेदी करनार्या कडुन त्यापेक्षा काही प्रमानात का होईना जास्त भावाने दुध ख़रेदी करतात असे आजवर चालत आले आहे.
कोविड १९ सुरु व्हायच्या अगोदर दुध संघाकड़न सरासरी २८ ते २९ रुपये प्रति लीटर भावाने रक़म मिलत होती.आज मात्र ती सरासरी प्रति लीटर मागे २३-२४ रुपयाने मिळत आहे. एकीकड़े आपण सांगत आहात कि, माझ्या शेतकरी वर्गाने घाबरन्याच कारण नाही, आम्ही तुम्हाला ख़ूब मदत करत आहों…प्रति लीटर मागे ५ रुपये दर कमी करुन तुम्हीं आमची मदत कशी करत आहात हे आम्हाला कळून नाही राहल…साहेब, आम्ही अनपढ़ नक्की आहों पण मूर्ख नाही कारण आम्ही या पुरोगामी महाराष्ट्राचे रहिवासी आहोत.कदाचित आपल्या दरबारातील रत्ननांनि आपल्या नज़रेस ही बाब आनुन दिली नसेल पण यावर थोड लक्ष घाला.
तसेच साहेब, ग्रामीण भागातिल दुध उत्पादक संस्था या तुमच्या जिल्हा संघामुळे परेशान होत आहे. जिल्हा दुध सघाचे प्रतिनिधित्व राजकीय मंडळीकड़े असल्याकारनाने दुध उत्पादकाला त्याचा फटका सहन करावा लागत आहे. त्यासाठी आम्ही खालिल मागन्या आपल्या समोर ठेवत आहों असे निवेदनातून म्हटले आहे
(१)दुध उत्पादक संस्थेला आपले दुध कूठही विकन्याचि परवानगी दयावि..दूध संघाला च दुध देन्याचे निर्बंध काढावे.
(२) संस्थेकडुन ज़ेव्हा दुध मोजून घेता त्यावेलीच दूधाची प्रत योग्य नसली तर जाग्यावरच परत करा..२४ तासानंतर दुध परत करण्याची प्रथा बंद करा।
(३) एकीकड़े आपल्या नियमानुसार सघाला दुध देने बंधनकारक आहे मग कधी-कधी आठवड्यातुन एकदा दुध ख़रेदी बंद चे आदेश का काढ़न्यात येते??आता कोविड१९ मधे दुध ख़रेदी इतक्याच लीटर ची करा असे आदेश सघातरफे का काढ़न्यात येत आहे????
कोविड१९ मधे महाराष्ट्रातिल जनतेला आपल्या कडून फ़ार आशा, आहेत आणी ती का असु नये??? आपनास हिन्दूसम्राट मर्द आमचे आशास्थान बालासाहेब ठाकरे यांचा वारस लाभला आहे..आपण सध्या कुठल्याही लोकांच्या संगतित असाल तरी आम्हाला नक्कीच विश्वास आहे कि, आपण या प्रकरणा मधे जातिने लक्ष घालून जे दुध उत्पादक आपल्या मुलाना दुध न पाजता आपल्या जनावरांचि देखरेख व आपल्या परिवाराचा ख़र्च भाग़वीन्या साठी दूधाची विक्री करतात त्याना आपनाकड़न योग्य तो न्याय दयाल अश्या आशेचे निवेदन सादर करुण मा. ना. श्री नितिनजी गड़करी यांना माहीतीस्तव सादर केली आहे
तसेच कोविड१९ च्या कालावधित सहकारी संस्थेने खरेदी क़ेलेल्या व संघाला पूरवठा क़ेलेल्या दूधाला ५ रुपयाचा जो भावाचा फ़रक आहे त्याची योग्य ती यादी तैयार करुन दुध उत्पादक़ाच्या खात्यात थेट रक़म टाकावी अशी मागणी केली आहे

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …