Breaking News

*कमलापूर येथे नक्षल्यांनी बांधले बॅनर*

*कमलापूर येथे नक्षल्यांनी बांधले बॅनर*

गढ़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुड़कर

गडचिरोली: नक्षल्यांनी काल रात्री अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील चौकात बॅनर लावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

रात्री सशस्त्र नक्षली गावात आले. सर्वप्रथम त्यांनी चौकातील सीसीटीव्ही कॅमेरा हलविला आणि बॅनर बांधले. २ मे रोजी सिनभट्टी जंगलात ठार झालेली नक्षली सृजनक्का हिच्या मृत्यूच्या निषेधार्थ २२ मेपर्यंत जिल्हा बंद ठेवण्याचे फर्मान नक्षल्यांनी सोडले आहे. परिसरात पत्रकेही टाकली आहेत. बॅनरवर भाकपा(माओवादी) अहेरी एरिया कमिटी, असा उल्लेख आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …