Breaking News

*मूठभर कापूस जाळा आंदोलन* *जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष दिलीप घोरमारे यांच्या नेतृत्वात सावनेर,काटोल, नरखेड तालुक्यात मुठभर कापूस जाळून नोंदवला निषेध*

*मूठभर कापूस जाळा आंदोलन*


*जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष दिलीप घोरमारे यांच्या नेतृत्वात सावनेर,काटोल, नरखेड तालुक्यात मुठभर कापूस जाळून नोंदवला निषेध*

*प्रतिनिधी सुरज सेलकर सोबत दिनेश चौरसीया सावनेर*
*सावनेर:-काटोल नागपुर,नरखेड शेतकरी संगठनेचा मुठ भर कापूस जाळा आंदोलन दि.22 मे ला सावनेर येथे मूठ भर कापूस जाळा आंदोलन करण्यात आले..*


*किमान आधारभूत किमती च्या आधारे सी. सी. आय. मार्फत सरकार ची कापूस खरेदी संथ गतीने सुरू आहे.पेरणी ची वेळ जवळ आल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. या शासकीय खरेदी मध्ये तीन ग्रेड आहेत लांब धाग्याचा कापूस, मध्यम व अरुंद परंतु शासनाने सीसीआई ला फक्त लांब धाग्याचा कापूस घेण्याचा आदेश दिलेला आहे .मध्यम व अरुंद धाग्याचा बाजारात कुणीही वाली उरलेला नाही .सीसीआई च्या खरेदीत गुणवत्ता ही सीसीआई चा ग्रेडर निर्धारित करतो परंतु बहुतेक ठिकाणी जीन मालक यात हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या कापसाची गुणवत्ता खराब असल्याची बतावणी करून त्यांच्याकडे नसलेले अधिकार गाजवण्याची प्रयत्न करून शेतकऱ्यांची कोंडी करण्यात येत आहे.*
*एकीकडे शासनाचे आदेश फक्त लांब धाग्याचा कापूस घ्या तर दुसरीकडे जीन मालक अश्या दुहेरी अडचणीत कापसाचा शेतकरी अडकलेला आहेत. सर्वच गुणवत्तेचा भाव ठरवून कापूस खरेदी करण्याचा आदेश सरकार ने सीसीआई ला द्यावा. व गुणवत्ता करिता सीसीआई ने ग्रेडर ची नेमणूक केली असून जीन मालकांनी यात हस्तक्षेप करू नये.या दोन मागणीकडे लक्ष वेढण्याकरिता शेतकरी संघटने तर्फे सोशल डिस्टसिंग चे नियम न तोडता कापूस जाळा आंदोलन करण्यात आले*
*शेतकरी सघटनाचे नागपुर जिल्हा युवा आघाड़ी अध्यक्ष,दिलीप घोरमारे यांचे नेतृत्वात सावनेर,काटोल, नरखेड तालुक्यात शेतकरी संघटनेचे मदन कामडी,सुनिल वडस्कर,हर्ष कूथे,नितीन बोबडे,राजू बोबडे, रोशन गवृत्तकर, विनोद सेबेकर,शशी पाटील,इत्यादी उपस्थित मुठभर कापूस जाळून शासनाच्या कापुस खरेदी धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …