*पतंजलि मौदा द्वारा मोफत शेतीमाती परीक्षण*
*ग्रामीण युवकांना रोजगारा सोबतच मिळणार माती प्रशिक्षणाचा अनुभव*
*पतंजली चे स्तुत्य उपक्रम*
*तालुका प्रतिनिधी तुकाराम लुटे मौदा*
*मौदा: किसान सेवा समिती हरीद्वार व पतंजलि किसान सेवा समिती मौदा (नागपूर) द्वारा मौदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील माती परीक्षण निःशुल्क दरात करण्यात येत आहे. याकरीता पतंजलिच्या वतीने गावातील बेरोजगार सुशिक्षित युवक-युवतींना रोजगार म्हणून “धरती के डाॕक्टर” म्हणून. मानधन तत्वावर नियुक्त करण्यात आले आहे.
कोविड-19 शासकीय नियमानूसार मास्क, सोशल डिस्टंसिंग व काळजीपूर्वक कार्य केल्या जात आहे. याकरिता मौदा क्षेत्र व्यवस्थापक म्हणून कौस्तूभ दारोडे, व सहकारी आशिष माथूरे कार्य करीत आहेत. युवाभारत हरीद्वारचे केंद्रीय प्रभारी सचिन यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण नागपूर जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. निःशुल्क शेतातील माती परीक्षण असल्यामुळे मौदा तालूक्यातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन किसान सेवा समितीचे तालुका प्रभारी नरेन्द्र बाळबुधे व भारत स्वाभिमान ट्रस्ट चे प्रभारी देवेन्द्र सोनटक्के, डॉ. सुनिल बोरकर, दिनेश ढोबळे व सुनिल ठाकरे व प्रसिद्धी प्रमुख तुकाराम लुटे तसेच पतंजलि योग समिती मौदा द्वारा करण्यात येत आहे.*
Maharashtra News Media सच की आवाज