Breaking News

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे विस्थापित मजूर व रोजंदारी मजुरांना दिलासा* *आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मानले पंतप्रधानांचे आभार*

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे विस्थापित मजूर व रोजंदारी मजुरांना दिलासा*
*आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मानले पंतप्रधानांचे आभार*

कोरपना प्रतिनिधी-गौतम धोटे

चंद्रपरशिधापत्रिका नसलेल्या विस्थापित मजूरांना व रोजंदारी मजुरांना कोरोनाच्या संकटकाळात मोफत धान्य देण्यासाठी आत्मनिर्भर भारत आर्थिक पॅकेजच्या माध्यमातून आठ कोटी विस्थापित व रोजंदारी मजुरांना दिलासा दिल्याबद्दल माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत .

संपूर्ण देशात अडकलेल्या विस्थापित मजुरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नव्हते त्या स्थलांतरित मजुरांना धान्य उपलब्ध करण्यास राज्य सरकार तयार नव्हते. या संदर्भात आपण केंद्र व राज्य सरकार कडे सातत्याने पाठपुरावा केला. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आत्मनिर्भर भारत आर्थिक पॅकेजच्या माध्यमातून याबाबत निर्णय घेतल्यामुळे विस्थापित कामगारांना व रोजंदारी मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विस्थापित मजुरांना दर महिन्याला प्रत्येकी पाच किलो याप्रमाणे दोन महिन्यांसाठी (मे आणि जून) मोफत धान्य केंद्राच्या कोट्यातून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी देण्यात आली. यासाठी अन्नधान्य सबसिडी देण्यात येणार आहे. याखेरीज आंतर राज्य वाहतूक आणि हाताळणी यावर होणारा खर्च, वितरकाचा लाभ यासाठी येणारा खर्चही पूर्णपणे केंद्र सरकार करणार आहे. धान्य वाटपाची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे तसेच राज्य सरकारने सुद्धा 19 मे रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे अशी माहिती आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …