*डॉ हरिभाऊ आदमने कला वाणिज्य महाविद्यालयात दिवसात रंगली “झुम बराबर झुम”*
*पवित्र शिक्षण संस्थानाचा दुरुपयोग करणार्यावर कारवाई ची मागणी*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः येथील डॉ हरिभाऊ आदमने कला वाणिज्य महाविद्यालय तालुक्यातील एक ख्यातीचे शिक्षण संस्थान असुन सदर महावु शिक्षण ग्रहण करुण अनेक क्षेत्रातून शहरासह तालुक्याचे नाव लौकिक करणार्याची मोठी संख्या असुन आजही या शिक्षण संस्थानाचे नाव मोठ्या अभीमानाने घेण्यात येत आहे.*
*परंतू जेव्हा पासून नवीन प्राचार्यांनी या संस्थेचे प्राचार्य पदाचे कारभार सांभाळले आहे तेव्हा पासून सदर महाविद्यालय या ना त्या कारणावरून नेहमीच चर्चेचा विषय बनून सदर शैक्षणिक संस्थेला गालबोट लावत असे परंतू आता तर सदर महाविद्यालयाचा वापर चक्क “दारू व मटन पार्टी” करिता होत असल्याचे धक्कादायक वु्त्त उघडकीस आले आहे*
*दोन दिवसापुर्वी सदर डॉ हरिभाऊ आदमने महाविद्यालयाच्या आवारात प्राचार्या सह काही लोकांची उपस्थिती आढळून येताच ही तर सातत्याची बाब आहे म्हणून कुणी लक्ष दिले नाही परंतू काही माजी विद्यार्थ्यांनी हिम्मत करून महाविद्यालयाच्या आवारात गुपचूप प्रवेश करुण बधितले असता त्यांना प्राचार्या सोबत त्यांचे चार यार मटनाच्या बोट्यांवर ताव मरत असुन सोबत “झुम बराबर झुम शाराबी” चा खेळ मांडून बसल्याचे निदर्शनास येताच त्याने सदर घटनेची सुचना सावनेर पोलिसांना सदर घटनेची सुचना देऊण ज्या शिक्षण संस्थेतून त्यांनी शिक्षण घेतले त्या संस्थेचे ऋण फेडण्याचे कार्य आपल्या कर्तव्य दक्षतेने केले*
*सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय निशांत जुनोनकी व सहकारी यांनी सदर घटनास्थळी धाव घेतली असता तेथे मटनाचा गंज,दारूच्या बाटल्या सह आणी सात आठ लोकं दिसून आले.आधितर पोलिसांना बघून त्यांचा नशाच झिंगून गेला व अ..ब…ब..फ..फ…फ करू लागले व प्राचार्यांनी सातत्याने सदर महाविद्यालयाचे पावित्र धोक्यात आणनार्या सततच्या कु्तीचे बिंग फुटले*
*तक्रारकर्त्यांनी नमूद केलेली तक्रार सत्य आढळून येताच सदर घटनेची नोंद घेऊण पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय निशांत जुनोनकर व सहकारी करत आहे*
*तपास सुरु आहे सत्यता लवकरच निश्पन्नास येईल*
पो.नी.अशोक कोळी
*सदर घटनेची नोंद घेऊण तपास सुरू असुन सत्यता नक्कीच निष्पन्नास येईल व सदर घटनेची माहीती कुलगुरु राष्ट्र संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर च्या शिक्षण विभागास देऊण योग्य कारवाई करण्यात येईल अशी महीती सावनेर पोलीस स्टूचे पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी आमच्या प्रतिनिधीला दीली*
*घटनेची चौकशी करुण दोषींवर योग्य कारवाई करू*
दामोधर पराते अध्यक्ष रा.वि.शि.स.खापा
*सदर घटनेची लेखी तक्रार काही माजी विद्यार्थ्यांनी केली असून सदर बाब ही गंभीर स्वरूपाची असुन राष्ट्र विकास शिक्षण संस्था खापा सारख्या ख्यातीप्राप्त शैक्षणिक संस्था व्दारे संचालक डॉ हरिभाऊ आदमने कला वाणिज्य महाविद्यालय सावनेर येथे घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहीती घेऊण व एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमुन सदर घटनेचा योग्य उलघडा करुण संबंधित दोषींवर योग कारवाई करणार असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष दामोधर पराते यांनी आमच्या प्रतिनिधीला भ्रमण ध्वनी द्वारे दीली*
*डॉ हरिभाऊ आदमने कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य विरेंद्र जुमडे यांना त्यांचे दोन्हीही मोबाईल वर दहा ते बारा वेळा फोन करुण व वाँटसप वर मँसेज करुण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणाचा प्रामाणिक प्रयत्न केले असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही*