*लॉकडाऊन पुन्हा वाढला – 5.0 टप्पा व अनलॉक 1 ची घोषणा*
*कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन*
*८ जूनपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू होणार*
लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्याची घोषणा केलीय. यानुसार कंटेन्मेंट झोनमध्येही टप्प्याटप्प्याने सूट देण्यात येणार आहे. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर पूर्णपणे सूट राहील. १ जूनपासून हे दिशानिर्देश ३० जूनपर्यंत लागू राहतील. रात्रीची संचारबंदीही सुरूच राहील. रात्री ९ वाजेपासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. आतापर्यंत रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती.
नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्याची घोषणा केलीय. कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. पण कंटेन्मेंट झोनमध्येही टप्प्याटप्प्याने सूट देण्यात येणार आहे. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर पूर्णपणे सूट राहील. १ जूनपासून हे दिशानिर्देश लागू होतील ते ३० जूनपर्यंत कायम असतील.
*रात्रीची संचारबंदीही सुरूच*
रात्री ९ वाजेपासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. आतापर्यंत रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. ही संचारबंदी कमी करण्यात आली आहे. शाळा, कॉलेज आणि शिक्षणसंस्था सुरू करण्याबाबत सरकार नंतर दिशानिर्देश जारी करणार आहे.
*८ जूनपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू होणार*
मंदिर, मज़ीद, गुरुद्वारा आणि चर्च सुरू करण्यात येतील. अनेक राज्यांनी मॉल सुरू करण्याची मागणी केली होती. मॉलही टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील. शाळा, कॉलेज दुसऱ्या टप्प्यात उघडण्याची शक्यता आहे. तर ८ जूनपासून हॉटेल्स, रेस्टॉरंटही सुरू करण्यात येतील. पण सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क बंधनकारक असेल. धार्मिक स्थळांसह सलूनही सुरू होतील. पण त्यासाठी अटी लागू केली जातील. त्यांचे पालन करावे लागेल. पण राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे.
*कुठेही जाता येणार*
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यावरील बंदी हटवण्यात आली आहे. राज्यातही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार आहे. तसंच कुठही येण्या-जाण्यासाठी आता कुठलीही परवानगीची घ्यावी लागणार नाही.
*राज्यांकडे अधिक अधिकार*
राज्यांना केंद्र सरकारने जास्त अधिकार दिले आहेत. बस, मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्यांनी घ्यायचा आहे. केंद्र सरकारने बंदी हटवल्यानंतर राज्य सरकार निर्णय घेऊ शकणार आहेत.
काय आहे नवीन नियमावली?
* रात्री 9 ते पहाटे पाच पर्यंत असणार संचारबंदी
* 8 जूनपासून रेस्टॉरंट्स आणि मॉल्स सुरू करण्यास अनुमती
* कंटेन्मेंट झोनच्या बाहेरील परिसरातील निर्बंध शिथिल
* शाळा सुरू करण्यासंदर्भात जूनमध्ये निर्णय घेण्यात येणार
* राज्य सरकार, पालक संघटना, शाळांशी चर्चा करूनच निर्णय घेणार