*दुबळ्यावर दुसरा आषाढ*
*सावनेर तालुक्यात टोळधाडीचे थव्यांचे आगमन*
*जि.प.उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी पाहनी करुण कुषी अधिकारी यांना दिल्या सुचना*
*शेतकरी बांधव चिंतातुर*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेर : मोर्शी,नरखेड, काटोल तालुक्या सह संपि जिल्ह्यात थैमान घालनारे नातोड्या प्रजाती च्या टोडधाडिचे थवे आज सावनेर परिसरात सायंकाळी 4-00 वाजताचे जवळपास प्रवेश केला.पूर्वे कडून पश्चिमे कड़े त्यांच्या प्रवास होता शेवटी ७ – ७.३० वाजता,भोजापुर, नरसाला, पंढरी, जलालखेड़ा, मंगसा, उमरी,खानगाव,खुरजगाव, या शिवारात ही टोडधाड मुक्कामी उतरल्याचे निदर्शनास येत असून या भागातील शेतकरी शेतात धुर करून, थाल्या,पीपे,फटाके यांचा आवाज करून हाकलून लावन्याचा प्रयत्न करीत असुन नरसाळ्यात चन्द्रकांन्त बोंडे, कृष्णा घोरमाडे, आनंदराव डोळस सह अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पहावयास मिळाल्या, यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे सायंकाळी ५ वाजता पासून त्यांच्या मागावरच होते त्यांनी आपल्या क्षेत्राचे आमदार मंत्री सुनील केदार यांचेशी फ़ोनवर संपर्क केला व त्यांच्या निर्देशानुसार कृषि अधिकारी कु. कोरे यांना निर्देश दिले.*
*नरसाळ्यात त्यांनी शेकर्यांना ट्रक्टर चा सायलेंसर काढून आवाज तसेच फटाक्यांचा थाल्या वाजवून धुर करून टोड हाकलन्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी कृषि अधिकारी अश्विनी कोरे हिला पहाटे फवारणी करण्याचे आदेश दिले. उप विभागीय अधिकारी यांनी सांगितले की आम्ही टोडधाड कुठे थांबतात हे पाहुन पहाटेच्या वेळेला फवारणी करन्याच्ये आदेश कृषि विभागाला दिले आहे आम्ही प्रत्यक्ष नजर ठेवून असल्याचे सांगत शेतकऱ्यांचे कमीतकमी नुकसान होघल अशी कु्ती तात्काळ अवलंब करण्याचे दिशानिर्देश जिल्हा परिषद नागपूर चे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी कु्षी अधिकार्यांना दीले*
*एकीकडे कोरोना शी दोन दोन हात करत हतबल होऊ पाहणार्या शेतकरी बांधव आता सर्व सुख दुखः नफा नुकसान विसरून नविन हंगामाच्या तयारीत लागला अश्यातच हा टोळधाडीचा हल्ला यावर तातडीने उपाय योजना न झाल्यास व काही काळ पुढे पर्यंत हे टोळ क्षेत्रात टिकु राहीले तर मु्ग नक्षत्राच्या पुर्वी होणारी कपाशीच्या लागवडीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तर सध्याच्या स्थितीत शेतात असलेले संत्रा,मोसंबी,आंबा,मका व फळभाज्या मोठ्याप्रमाणात प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही*