‘एचटीबीटी’ बियाण्याला परवानगी द्या – शेतकरी संघटना  कारवाई थांबविण्यासाठी गृहमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

‘एचटीबीटी’ बियाण्याला परवानगी द्या – शेतकरी संघटना 

कारवाई थांबविण्यासाठी गृहमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

*विशेष प्रतिनिधी नागपुर*
नागपूर : केंद्र शासनाने प्रतिबंध लावलेले कपाशीचे ‘एचटीबीटी’ वाण महाराष्ट्र वगळता इतर राज्यात मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. राज्यात कृषी व पोलीस विभाग मात्र शेतकºयांवर कारवाई करीत आहे. हे वाण गुलाबी बोंडअळी प्रतिबंधक असल्याने तसेच उत्पादनखर्च कमी असल्याने ते राज्यातील शेतकरयांना परवानगी द्यावी तसेच शेतकऱ्यांवर कारवाई करू नका, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. यासंदर्भात शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी शनिवारी (दि. ३०) सायंकाळी सकारात्मक चर्चा केली.
साऊथ एशिया बायोटेकचे अध्यक्ष तथा कृषी वैज्ञानिक निवड समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी यांनी गृहमंत्र्यांना बियाण्यांच्या ‘जीएम’ तंत्रज्ञानाबाबत विस्तृत माहिती दिली. माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केंद्रीय पर्यवरण मंत्री बाबल सुप्रियो यांनी ‘एचटीबीेटी’ अर्थात ‘जीएम’ बियाणे मानवी आरोग्य व पर्यावरणास घातक नाही, असे लोकसभेत स्पष्ट केले होते. हीच बाब माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही लोकसभेत स्पष्ट केली होती. त्यामुळे राज्य शासनाने या बियाण्यांच्या ‘ट्रायल’ला परवानगी देऊन ते शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली.
‘जीएम’ बियाण्यांना सरकारने परवानगी नाकारल्याने बोगस बियाणे बाजारात आणले जाते आणि त्यातून शेतकऱ्यांनी फसवणूक केली जाते, ही बाब शेतकरी संघटनेचे नेते राम नेवले यांनी गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. ही फसवणूक थांबविण्यासाठी सरकारने शेतकºयांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहावे, अशी मागणीही त्यांनी केली. चर्चेत शेतकरी संघटना युवा आघाडी प्रमुख सतीश दाणी, सतीश देशमुख, तंत्रज्ञान आघाडी प्रमुख विजय निवल, मधुसुदन हरणे, राजेंद्र झोटिंग, लक्ष्मीकांत कौठकर सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.

जागतिक स्पर्धेत टिकणे आवश्यक
‘जीएम’ तंत्रज्ञान बियाणे जगभर वापरले जात आहे. या बियाण्यांमुळे सोयाबीन व कपाशीसह अन्य पिकांचे उत्पादन वाढले आहे. शिवाय, उत्पादनखर्चही कमी झाला आहे. भारतात या बियाण्यांचा शेतमाल आयात केला जातो. भारताला जागतिक शेतमालाच्या बाजारपेठेत टिकाव धरण्यासाठी ‘जीएम’तंत्रज्ञान बियाणे अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांना ‘जीएम’ तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळाले तर देशात शेतमाल उत्पादनात क्रांती होईल, हा मुद्दा शेतकरी संघटनेचे नेते ललीत बहाळे यांनी पटवून दिला.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …