Breaking News

*गाव नाल्या, रस्ते बांधकामात दिरंगाई व साहित्याची हेराफेरी* *चिचघाट वाशीयांचा आरोप*

*गाव नाल्या, रस्ते बांधकामात दिरंगाई व साहित्याची हेराफेरी*

*चिचघाट वाशीयांचा आरोप*

*उप जिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे*
*मौदालगत असलेल्या चिचघाट पुनर्वसन ठिकाणी सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाल्या, पिण्याचे पाणी, व रस्त्याच्या लाखो-करोडो रुपयांची कामे पुनर्निर्माण कार्य हे गणपती प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलेला आहे. सदर काम हे वर्षभरापासून सुरू असले तरीही काम व्यवस्थितरीत्या होत नसून अपूर्ण असल्याचा आरोप चिचघाट वाशीयांनी दि.४ जुन रोजी निवेदनाद्वारे केला आहे.

*नाल्यातून निघालेली माती गावठाणाच्या कामाकरितां न वापरतात सदर माती सुपरवायझर विक्की यांनी परस्पर मौदा येथे विकली आहे व त्याबाबत गावकऱ्यांनी विचारणा केली असता हे माती आम्ही काढलेली असून याची विल्हेवाट करण्याची जिम्मेदारी आमची आहे असे उडवाउडवीची उत्तरे देत आहे. तसेच तुटलेले पुलिया या बाबत विचारणा केली असता तुम्ही ऑफिसला विचारा असे उलट-सुलट उत्तरे देऊन काम करण्यास मनाई केली आहे.*

*सदर रोडच्या कामामध्ये चुरी व गिट्टीची पूर्तता करण्यात आली नाही. करिता तातडीने चौकशी करून सदर काम दिलेल्या निकषाप्रमाणे करून घेण्यात यावे गावातील कामासाठी आलेल्या सिमेंटच्या पुरेपूर योग्य वापर न करता मौदा येथे नेऊन विकल्याचे प्रत्यक्षदर्शी लोक गावात आहेत. व त्याच प्रमाणे गावात आलेल्या मोदी गोल्ड नामक पाईप सुपरवायझर ने जुन्या गावा (नवेगाव, चिचघाट) मध्ये नेऊन विकण्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यामुळे रस्ते, नाल्या बांधकाम व पाईपलाईन कामात फार मोठे हेराफेरी झाल्याचे आरोप गावकऱ्यांनी निवेदनातून केले आहे.*

*तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करून उरलेली कामे त्वरित पावसाळ्यापूर्वी पुर्ण करण्यात यावी अशी गावकऱ्यांनी मागणी वंजारी सहाय्यक अभियंता गोसेखुर्द पुनर्वसन नागपूर यांच्याकडे केली आहे.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …