Breaking News

*सावनेर तालुक्यातील भानेगाव सील* *आढळलेला रुग्ण नागपूर रवाना*

*सावनेर तालुक्यातील भानेगाव सील*

*आढळलेला रुग्ण नागपूर रवाना*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी सुरज सेलकर सावनेर*
*सावनेरतालुक्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत भानेगाव मध्ये सोमवार ला एक कोरोना पॉजीटिव्ह पेशेंट मिळाल्याने खळबळ उडाली असुन या परिसराला सिल करुन रेड झोन घोषित करण्यात आले आहे, याच बरोबर कोरोना पॉजीटिव्ह युवकाच्या परिवारा सह त्याचा संपर्कात आलेल्या 29 व्यक्तिना नागपुर एम एलए होस्टल मध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.*

*सोमवार ला नवीन भानेगाव वार्ड क्र 2 मधील 38 वर्षीय युवक कोरोना पॉजीटिव्ह निघाला, तो युवक मागील महीण्यात 25 तारखेला उडीसा वरुण भानेगाव ला सासुरवाडीत आला होता काही दिवस भानेगाव मधील शेषराव वानखेडे कॉलेज मध्ये क्वारंटाईन सुद्धा राहीला , नंतर सासुरवाडीत वाढदिवस कार्यक्रमात सहभागी सुध्दा झाला, रविवार ला त्याला अस्वस्थ वाटु लागल्याने त्याने अगोदर खापरखेडा चिचोली प्राथमिक आरोग्य केन्द्र मध्ये तपासणी केली नंतर कोरोना चाचणी केली सोमवार ला त्याची रिपोर्ट कोरोना पॉजीटिव्ह असल्याचे येताच खापरखेडा येथे एकच खळबळ उडाली , या युवकाला नागपुर मेयो हॉस्पीटल मध्ये भर्ती करण्यात आले असुन भानेगाव परिसर सिल करुन रेड झोन घोषित करण्यात आले आहे.*
*सावनेर तालुक्यात दहेगाव, आजनी,जटामखोरा, सावनेर व भानेगाव असे प्रत्येकी एक असे एकुण पाच कोरोना पाँजेटिव्ह आढळले असुन सर्वांचा नागपूर येथे उपचार सुरु आहे*
*तहसीलदार दिपक कारंडे,मुख्याधिकारी रवींद्र भेलावे, पोलीस निरीक्षक अशोक कोळी सह वरिष्ठ चिकित्सक डॉ भुषण सेंबेकर, डॉ. संदिप गुजर आदि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत तसेच नागरिकांना शासनाने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करण्याचे आव्हान केले आहे*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …