*कुहीतील पचखेडीत 23 जणांना केले होम क्वारंटाईन*

*लग्नात जेवण वाढणारा होता पाँजेटिव्ह*
विशेष प्रतिनिधि- निखिल खराबे
कुही:– कुही तालुक्यातील प्रमुख मोठ्या गावातील एक नावाजलेले गाव पचखेडी येथील दोन कुटुंबातील लोक भंडारा जिल्ह्यात पवनी येथील मालाची गावात लग्नासाठी गेले होते. सदर लग्न कार्यक्रमात आधीच क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीने जेवन वाढले. आणि त्यानंतर त्याचा कोरोना अहवाल पाँजेटिव्ह आल्याची माहिती पडली त्यामुळे त्या लग्नसमारंभात सहभागी पचखेडी येथील तब्बल 23 जणांना होम क्वारंटाईन केले आहेत. तालुक्यातील पाँजेटिव्ह च्या संपर्कात येणारी ही पहिलीच घटना असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

“बातमीनुसार या दोन्ही कुटुंबातील हे सदस्य ज्या दिवशी लग्न समारंभात सहभागी होण्याकरिता गेले त्याच दिवशी सायंकाळपर्यंत परत सुद्धा आले पण दुर्दैवाने लग्न समारंभात वाढपीच पाँजेटिव्ह निघाल्याने त्या सर्व लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले.
ह्या संपूर्ण घटनेने तालुक्यात भीतीचे वातावरण असून आतातरी लोकांनी सोशल डिस्टनसिंग व अनावश्यक प्रवास करू नये असे आव्हान करण्यात येत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज