Breaking News

*नरेश पुगलिया च्या मध्यस्थीने कंत्राटी कामगारांचा संप मागे अंबुजा तील कंत्राटी कामगारांनचा सिमेंट उद्योगातच काम बंद आंदोलन* *या आंदोलनाने अंबुजा अधिकाऱ्याची झोपच उडाली*

*नरेश पुगलिया च्या मध्यस्थीने कंत्राटी कामगारांचा संप मागे
अंबुजा तील कंत्राटी कामगारांनचा सिमेंट उद्योगातच काम बंद आंदोलन*

*या आंदोलनाने अंबुजा अधिकाऱ्याची झोपच उडाली*

कोरपना प्रतिनिधि -गौतम धोटे

कोरपना :- कोरोना विषाणूच्या महामारी मुळे राज्यातील उद्योग बंद होते या दरम्यान अंबुजाने एप्रिल महिन्याचा पगार दिला परंतु मे महिन्याचा पगार अर्धाच दिल्याने कंत्राटी कामगारांनी उद्योगातच दिनांक 10 जुन ला सकाळी 9ते12 वाजेपर्यंत काम बंद आंदोलन केले व काम ठप्प केले. यात उद्योगातील अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. अखेर मराठा सिमेंट कामगार संघटना उपरवाही चे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया यांनी कामगार आणि मॅनेजमेंट यांच्याशी मध्यस्थी करून मागण्या पूर्ण मिळवीत अखेर आंदोलन मागे घेण्यात आले. कोरोनाच्या संचारबंदीत संपूर्ण उद्योग बंद होते. अशातच काम नाही तर दाम नाही ही भुमिका न घेता शासनाच्या निर्देशानुसार सर्वच कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले होते. कंत्राटी कामगारांना एप्रिल महिन्या पर्यतचे पुर्ण वेतन देण्यात आले परंतु मे महिन्याचे वेतन अर्धाच दिला होता . आता उद्योग सुरु झाला मे महिन्याचे पुर्ण वेतन देण्यात यावे कंञाटी कामगारांना महीण्यात कामाचे दिवस वाढवून देण्यात यावे अशी मागणी करीत उदयोगातच काम बंद आंदोलन करण्यात आले उद्योगातील काम ठप्प झाल्याने येथील अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. तब्बल पाच तास आंदोलन सुरूच राहिल्याने अखेर मराठा सिमेंट कामगार संघटना उपरवाही चे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मॅनेजमेंट व कंत्राटी कामगारात मध्यस्थी घडवून आणुन वाटाघाटी करुन मागण्या पूर्ण करण्यात आल्या यात मे महिन्याचे पुर्ण वेतन व कामाचे दिवस एक ते दिड महिन्या पर्यत विस दिवस नंतर सवीस दिवस काम मिळणार आहे. या आंदोलनाच्या वाटाघाटीत मॅनेजमेंट कडुन युनिट हेड सुशीलकुमार पानेरी, कॉमर्शिअल हेड संजीवा राव, व एच आर हेड राम द्विवेदी यांनी सहभाग नोंदविला. या यशस्वी आंदोलनामुळे कामगारात आनंदाचे वातावरण दिसुन आले तर कामगारांनी नरेश पुगलिया व संघटनाचे पदाधिकारी यांचे आभार मानले. या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी अजय मानवटकर, सागर बलकी,इक्बाल शेख, धरमेश पारधे, अभय ठावरी, संतोष झाडे यांनी अथक परिश्रम घेतले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …