Breaking News

*मौदा येथे सलून व्यवसाय बचाव आंदोलन संपन्न* *दुकानासमोर काळीफीत व फलक लाऊन निषेध*

*मौदा येथे सलून व्यवसाय बचाव आंदोलन संपन्न*

*दुकानासमोर काळीफीत व फलक लाऊन निषेध*

उपजिल्हा प्रतिनिधी – तुकाराम लुटे

मौदा : लॉकडाउनच्या सर्वाधिक फटका बसलेल्या सलून व्यवसाय सुरू करण्याची मागणी वेळोवेळी शासनाकडे सलून व्यवसायीकांनी केली आहे. या पाचव्या टप्प्यात सर्वत्र दुकाने सुरू करण्यात आले. तरी सलूनचे दुकाने सुरू करू देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला नाही. या विरोधात नाभिक मौदा तालुका संघटनेने दि. ११ जुन रोजी आपापल्या दुकानासमोर मागण्यांचे फलक काळीफीत लावून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुक आंदोलन अतिशय शिस्त बद्ध पद्धतीने केले.

आमच्या व्यवसायासाठी कायमचे लाँकडाऊन असेल तर दर महा आर्थिक मदत देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन मौदा तहसीलदार व मौदा मुख्याधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.

यावेळी नाभिक एकता मंचचे तालुकध्यक्ष संदिप सुर्यवंशी, तालुका सचिव नरेंद्र चन्ने, दुकानदार संघ शेखर मेश्राम, अविनाश चन्ने, प्रदिप सुर्यवंशी तसेच मौदा शहरातील नाभीक समाज बांधव उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …