*महामार्गाच्या-ले बाय ला मद्यपींची खुली मधूशाला*
*राष्ट्रीय महामार्गावर प्रशासन चे दुर्लक्ष
उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे
मौदा : देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील तीन महिन्यापासून लॉक डाऊन सुरू आहे. मागील १५ दिवसापूर्वी दारू दुकाने आणि बार याना उघडण्याची परवानगी शासनाने दिली. पण बार मध्ये बसून मद्य प्राशन करण्यास प्रतिबंध कायम ठेवण्यात आला. व पार्सल सुविधा उपलब्ध केली त्यामुळे मद्य प्राशन करण्याची नवी उक्ती शोधण्यात आली. त्यामुळे अनेक तळीराम दारू दुकानातून दारू विकत घेऊन शेतातील एखाद्या झाडाखाली ” मिल बैठे दो यार, खूप जमेगा रंग “ या प्रमाणे अनेक ग्रामीण भागातील शेतात हे दृश्य पाहायला मिळते. तर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ले बाय रोड वर सायंकाळी अनेक मद्यपी बसलेले दिसून येतात.
महामार्गावर असलेल्या बार मधून मद्य विकत घेवून सोबत चकना घेऊन ले बाय रोडवर बसून आपला प्रोग्रॅम सुरू करतात. तर काही जण गाडीत बसून मद्याचा आस्वाद घेत असतात. सध्या हे चित्र महामार्गावर दिसून येत आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज महामार्गाच्या बाजूला वेपर्स पॅकेट, रिकाम्या दारु, पाणी बॉटल्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या दिसून येतात. अनेकदा महामार्गावरून ये जा करणारे वाहन चालक लांबचा प्रवास केल्यानंतर सायंकाळी आपले वाहन ले बाय रोड ला उभे करून स्वयंपाक करतात. व आराम करून पुढचा प्रवास सुरू करतात. परंतु मागील काही दिवसात मद्यपी लोकांनी या ले बाय रोडवर आपली खुली मधूशाला सुरू केल्यामुळे वाहन चालकाची मात्र अडचण झाली आहे.
Maharashtra News Media सच की आवाज