*हिरापूर येथील आय. एस .ओ .जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारातील पेव्हर ब्लॅक बसविण्याचे काम पूर्ण*
**सरपंच प्रमोद कोडापे यांच्या प्रयत्नाना यश*
कोरपना विशेष – गौतम धोटे
कोरपना :- कोरपना तालुक्यातील मौजा हिरापूर येथील आय .एस. ओ जिल्हा परिषद शाळा ही विध्यार्थी व पालकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे .
शाळेच्या विकासात हिरापूर गावातील सर्व लहानापासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येकाचा वाटा काहींना काहीसा शाळेच्या विकासात्मक योगदानात आहे. येथील ग्राम पंचायत,शाळा व्य. समिती,गावातील आजी माजी पदाधीकारी,महिला,पुरुष,युवक बालक या सर्वांच्या अथक परीश्रमातून शाळेचा शैक्षणिक ,गुणात्मक,दर्जा हा उंचावून ही शाळा ज्ञानदानाचे कार्य करत आहे.
तत्कालीन शाळा व्य. समिती व मुख्याघ्यापक श्री. सुधाकर मडावी सर यांनी ग्राम पंचायतिचे सरपंच प्रमोद कोडापे यांना तोंडी व निवेदनाद्वारे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॅक बसविण्याची मागणी केली होती. ही मागणी सरपंच प्रमोद कोडापे यांनी तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय श्री.देवरावदादा भोंगडे यांच्या लक्षात आणून दिली व श्री.देवराव दादा भोंगडे यांनी w c l ,सि. एस.आर फ़ंडातून 2 लक्ष निधी,पेव्हर ब्लॅक करीता उपलब्ध करून दिला. त्याचे काम देखील पूर्ण झाले आहे .
याचबरोबर श्री देवरावदादा भोंगडे यांनी हिरापूर येथील जिल्हा परिषद शाळेची मोठी दुरुस्ती यासाठी देखील 4लाख 50 हजार रुपये एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे.या कामाचे टेंडर होऊन कोरोनामुळे काम सद्या स्थगित देऊन आहे. यासाठी देखील ग्राम पंचायत सरपंच प्रमोद कोडापे हे काम होण्यास पाठपुरावा करत आहे.
अश्या पुढाकारातून हिरापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील पेव्हर ब्लॅक चे काम पूर्ण होऊन गावातील ग्राम पंचायत,शाळा व्य. समिती,पदाधीकारी व ग्रामस्थ शिक्षकाकडून समाधान व्यक्त होत आहे.