*माथनीत नाली बांधकामात भ्रष्टाचार* *दोषींवर कारवाईची मागणी*

*माथनीत नाली बांधकामात भ्रष्टाचार*

*दोषींवर कारवाईची मागणी*

उपजिल्हा प्रतिनिधी – तुकाराम लुटे

मौदा : गावपातळीवर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली. परंतू हल्ली भ्रष्टाचाराचे घोडे सगळीकडेच मनसोक्तपणे चरत असल्याचे दिसून येते.

असाच प्रकार मौदा तालुक्यातील माथनी ग्रामपंचायत मध्ये चौदावे वित्त आयोगा अंतर्गत भुमिगत नालीचे बांधकाम करण्यात आले असता, त्यामध्ये इस्टीमेट नुसार काम झाले नसल्याची लेखी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नागपूर यांच्याकडे दि.१० जुन रोजी करण्यात आली आहे.

ठिकाण (कोठून ते कोठपर्यंत):

हरिदास तिघरे ते अजय तांबडे, शंकर मारबते ते सुरेश मडामे, राजु टेकाडे ते शरद महाजन, खेमराज तांबडे ते मंगला पटले, विलास पडोळे ते अमरदास पाचे व देवकाबाई कांबळे ते चंदू वासनिक यांच्या घरापर्यंत भुमिगत नालीचे बांधकाम करण्यात आले. परंतू यात खोदाई ३×३ फुट, खडीकरण ६ इंच, मास क्रांक्रिट ४ इंच, पाईप ४५० एमएम अर्धा इंच व मुरुम ६ इंच अशा प्रकारचे काम इस्टीमेट नुसार करण्यात आले नाही.

सदर कामाची चौकशी करून इस्टिमेट नुसार काम करुन घेऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य संगीता वामन पिसे, देवानंद सुपारे, लता नागपुरे, सिता वसंता तांबडे तसेच गावातील नागरिकांनी केले आहे.

गावातील नाली बांधकामात विकासाऐवजी भकास झाला असल्याचे ऐकून फार वाईट वाटले. यात जो कोणी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य दोषी असेल तर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी संतप्त प्रतिक्रिया माथनी येथिल जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पिसे यांनी दिली.

*प्रतिक्रिया*
*काम नियमातच व्यवस्थितपणे सुरू आहे. असा कुठलाही प्रकार झालेला नाही.*चोपकर, ग्रामसेवक, ग्रामपंचायत, माथनी

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …