*सावनेर तालुक्यातील 146 लोकांचे स्वँब टेस्ट* *तालुक्यात 2 जुन नंतर बाहेरून आलेले तसेच कोवीड़ 19 मधे सेवा देणारे अधिकारी कर्मचारी तसेच आशा वर्कर चा समावेश*

*सावनेर तालुक्यातील 146 लोकांचे स्वँब टेस्ट*

*तालुक्यात 2 जुन नंतर बाहेरून आलेले तसेच कोवीड़ 19 मधे सेवा देणारे अधिकारी कर्मचारी तसेच आशा वर्कर चा समावेश*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी दिनेश चौरसीया*

*सावनेर – दिवसेंदिवस कोरोना विषाणूंग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असली तरी आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन आपल्या कर्तव्याची जान ठेवत निरंतर या विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना आखत असुन अश्याच प्रकारे आज दि.14 जुन रोजी अस्थाई स्वरूपात कार्यरत असलेल्या पब्लिक स्कुल सावनेर या कोरंटाईन सेंटर मधे मेडिकल हाँस्पिटल नागपूर येथील तज्ञ चिकित्सकांच्या चमुने 2 जुन पासून सावनेर तालुक्यात मुंबई, पुणा,दिल्ली सह इतर प्रवास हिस्ट्री असणाऱ्यां सोबतच तालुक्यातील आरोग्य सेवक,नगर पालिका कर्मचारी, आशा वर्कर इत्यादी 146 लोकांच्या घश्यातील नमूने “स्वँब टेस्ट” घेऊण पुढील तपासणी करिता मेडिकल हाँस्पिटल नागपूर येथे रवाना करण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे कोवीड़ 19 चे प्रभारी वरिष्ठ चिकित्सक डॉ भुषन सेंबेकर यांनी दिली*

*याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,नायब तहसीलदार मसाळ,वरिष्ठ चिकित्सक डॉ. संदीप गुजर,डॉ. वाघ,तालुका आरोग्य आँफीसर मधुकर सोनोने तालुका आरोग्य अधिकारी सुरज सांगोडे,विजय वानखेडे,आदि प्रामुख्याने उपस्थित होते.*

*आज पार पडलेल्या “स्वँब टेस्टींग” चा अहवाल लवकरच मेडिकल हाँस्पिटल नागपूर येथून प्राप्त होणार असल्याची माहीती डॉ भुषन सेंबेकर यांनी देत नागरिकांना निवेदन केले की कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावा पासून आपले व आपल्या परिवाराचे संरक्षणा सोबतच आता पावसाळा सुरु होत असल्याने इतरही साथींच्या आजारापासून आपले संरक्षण करणे गरजे आहे करिता दुहेरी सुरक्षाव्यवस्था व काळजी घेणे आवश्यक असल्याने शासनाने कोवीड़19 या विषाणूंचा रोकथाम करण्यासाठी दिलेल्या दिशादर्शनासासोबतच पीण्याचे पाणी उकळून पीणे,आपले परिसर स्वच्छ ठेवने,डाँस व किटजन्यापासुन आपले व आपल्या परीवाराची सुरक्षा करणे तसेच ताप,सर्दी, खोकला सारखे लक्षणे दिसताच स्थानिक प्रशासन, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांना सुचीत करावे अथवा नजिकच्या प्राथमिक आरोग्य केन्द्रात जाऊण लगेच उपचार घ्यावे अशी विनंती डॉ भुषन सेंबेकर यांनी केली आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …