*आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
खापरखेडा:- देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे रुग्णांना रक्ताचा साठा कमी पडत आहे राज्यात शासन व सामाजिक संघटनेकडून रक्तदान करण्याचे आव्हाण करण्यात येत आहे त्यामुळे सामाजिक बांधिलकीचे ध्यान ठेऊन राज्याचे पर्यावरण मंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्याचे आव्हाण राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त युवासेना समन्वयक नागपूर ग्रा. राज तांडेकर यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन १३ जूनला दुपारी १२ वाजता धनगौरी सभागृह पिपळा (,डाकबंगला) येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व द्विप प्रजवलन करण्यात आले शिवसेना उप-जिल्हा प्रमुख अशोक झिंगरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी प्रामुख्याने तालुका प्रमुख नरेंद्र मोरे, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख गणेश कान्हारकर उपस्थित होते मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाना केलेल्या आव्हानाला मोठया प्रमाणात प्रतिसाद बघायला मिळाला ५१ शिवसैनिक रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान गोळा करण्यासाठी आयुषी ब्लड बँक याना पाचारण करण्यात आले होते याप्रसंगी कोरोना बाधित रुग्णाचा जीव वाचविणे काळाची गरज आहे रक्ताविना अनेकांचा मृत्यू होत आहे यासाठी राज्य शासन अनेक उपाययोजना करीत आहेत मात्र तरी सुद्धा रक्ताचा साठा कमी पडत आहे त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना रक्ताचा पुरवठा करने काळाची गरज आहे त्यामुळे कोरोना विपीदा परिस्थितीत प्रत्येक नागरिकांनी आवर्जून रक्तदान करावं असे आव्हाण नागपूर जिल्हा ग्रामिण युवासेना समनव्यक राज तांडेकर यांनी केले यावेळी गोपाल श्रीवास्तव, धीरज गुप्ता, सचिन गजभिये, कृष्णा बर्वे, योगेश जालंदर, मनीष कुंभलकर, चेतन भोंडेकर, रणजित रामटेके, प्रणय गुढधे, प्रणय ठाकरे, राकेश सोनेकर, अभिषेक चौरे, गोपाल ठाकरे, मंगेश ठाकरे, विकी भगत शैलेश कानोजिया, अमन पांडे, आदि युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.