*बल्लारपूर विधानसभेच्या जाणून घेतल्या खासदारांनी समस्या*
*नांदगाव, मानोरा गावांना भेटी : ग्रामस्थांनी वाचला समस्यांचा पाढा*
विशेष प्रतिनिधी -जुबेर शेख
चंद्रपूर : ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधा अद्याप पूर्ण केल्या नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील पांदण रस्ते, गाव तलावातील साचलेला गाळ, दोन गावांना जोडणारा रास्ता, ग्रामीण भागातील आरोग्याची समस्या अशा विविध समस्यांच्या पाढा ग्रामस्थांनी खासदार बाळू धानोरकर यांच्या पुढे वाचला.
लोकांनी मतरुपी आशीर्वाद दिला. त्यामुळे सतेसाठी नव्हे तर सेवेसाठी आपण लोकप्रतिनिधी झालो. ही भावना उराशी बाळगून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचुन त्यांचे प्रश्न मार्गी लावू असा प्रण खासदार बाळू धानोरकर यांनी उराशी बाळगला आहे.
समाजातील शेवटच्या घटकातील प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांच्या गावी जाऊन जाणून घेणे गरजेचे असते. त्यामुळे खासदार धानोरकर यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन त्या समस्या जाणून घेतल्या. बल्लारपूर विधानसभेत येथील ग्रामस्थांनी तर अनेक समस्या सांगून विकासाची परिभाषा बदलवून टाकली आहे. राज्यातील अत्याधुनिक प्रार्थमिक आरोग्य केंद्र उभारले. मात्र ती फक्त इमारत उभी असून लागणार कर्मचारी वर्ग व यंत्रसामुग्री अद्याप आली नसल्याचे मानोरा येथील ग्रामस्थांनी सांगितले.
या भागातील बांध तलाव, इटोली तलाव, मागली तलावाच्या गाळ अद्याप काढलेला नाही. त्यामुळे शेतीला लागणारे पाणी मुबलक प्रमाणात मिळत नसून परिणामी पिकांना पाणी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. धन खरेदी केंद्र हे उशिरा धन खरेदी करतात त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्याला माल विकावा लागतो. त्यात त्यांची लूट होत असते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात खरेदी सुरु करण्याची विनंती ग्रामस्थांनी केली. कवडजई – कोठारी या मार्गावर बंधारा बांधल्यास येथील शेतकऱ्यांना लाभ होईल, कोवीड- १९ मधील निधी अन्य कामांवर खर्च करण्यात आला असून त्यांची चौकशी करू असे आश्वासन खासदार बाळू धानोरकर यांनी दिले.
पांदण रस्ते नसल्यामुळे शेतातील माल अनन्यकरीता तारेवरची कसरत करावी लागत आहे. कवडजई – मनोरा रास्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, अनेक शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीत आलेली नाही किंवा त्यांना माहित नाही. त्यामुळे प्रत्येक बँक पुढे. यादी लावली जाईल असे आश्वासन खासदार बाळू धानोरकर यांनी दिले.
त्यासोबतच अन्य गावातील पदाधिकारी देखील मनोरा येथे आलेले होते. त्यात कवडजई, इटोली, उमरी पोद्दार, किन्ही, मोहाडी, गिलबिली, कोठारी व अन्य गावातील ग्रामस्थांनी असल्याचं प्रकारे आपल्या समस्या सांगितल्या. गेल्या अनेक दशकापासून या समस्या असाच असून अद्याप पूर्ण झाली नसल्याची खंत त्यांनी खासदारांना सांगितली. नांदगाव येथिल ग्रामस्थांनी सुद्धा गावातील प्रमुख समस्या देखील अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याचे सांगितले. यावेळी कॉग्रेस नेता विनोद दत्तात्रेय, रामू तिवारी, माजी नागराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, नगरसेवक भास्कर माकोडे, तालुका अध्यक्ष विनोद बुटले, सूर्या आडबाले, मधुकर पोडे, वासुदेव येरगुडे, गोविंदा उपरे, धाडूं दुधबाळे, महादेव देवतळे, अजय धोडरे, सुनील कोहरे, अरुण पेंदोर, जितेंद्र कुळमेथे, मुरली बुरांडे, लक्ष्मण निमकर, गणेश निमकर, मंगेश धोबे यांची उपस्थिती होती.