Breaking News

विज क्षेत्रातील कंत्राटी कामगार व शिकाऊ उमेदवारांचे प्रलंबित प्रश्न त्वरीत सोडवा

विज क्षेत्रातील कंत्राटी कामगार व शिकाऊ उमेदवारांचे प्रलंबित प्रश्न त्वरीत सोडवा

नरखेड तालुका-  श्रीकांत मालधुरे सोबत जलालखेडा प्रतिनिधि पवन कळंबे

तांत्रिक अप्रेंटीस कंत्राटी कामगार असोसिएशन आक्रमक : तीव्र आंदोलनाचा इशारा

नरखेड:-कोरोना काळात आपला जीव धोक्यात टाकुन अहोरात्र सेवा देणार्‍या राज्याच्या विज क्षेत्रातील कंत्राटी कामगार व शिकाऊ उमेदवारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या पुर्ततेसाठी तांत्रिक अप्रेंटीस कंत्राटी कामगार असोसिएशन आक्रमक झाली आहे. यासंदर्भात असोसिएशनच्या वतीने राज्य अध्यक्ष प्रभाकर लहाने यांच्या नेतृत्वात १३ जून रोजी राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, संपुर्ण देश, राज्य, जागतीक महामारीच्या महासंकटाशी लढा देत आहे. या काळामध्ये राज्य सरकारने केलेल्या सर्व उपाययोजना सर्वसामान्यांना दिलासा देणार्‍या आहेत. परंतु राज्याच्या विज क्षेत्रातील कंत्राटी कामगार व शिकाऊ उमेदवार हा संकटाच्या सर्व बाजुनी घेरला आहे. कंत्राटी कामगार अहोरात्र काम करून मरत आहे. कंत्राटदार पुर्ण पगार देत नाही. कंत्राटी कामगारांना सुरक्षा पुरविली जात नाही. पुर्ण प्रकीया होवुन सुध्दा ई.एस.बी.सी.मराठा उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली नाही. शिकाऊ उमेदवार हे अजुन प्रसिध्द केलेल्या भरती प्रकीया पुर्ण केव्हा होणार ? यांचीच वाट पाहत आहे. महावितरण कंपनीमध्ये वयोमर्यादा वाढविली जात नाही. कंत्राटी कामगारांना कायम सेवेमध्ये घेतल्या जात नाही. यासंदर्भात २० डिसेबर २०१९ रोजी विधानभवन नागपुर येथे विशाल महामोर्चा व्दारे शिकाऊ उमेदवार व कंत्राटी कामगारांनी आकोश व्यक्त केला होता. यावेळी तत्कालीन उर्जामंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी ८ दिवसात प्रश्न मार्गी लावण्याकरीता मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन दिले.परंतु आश्वासन पुर्ण झाले नाही. तत्कालीन उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी २०१७ ला मंत्रालयामध्ये बैठक घेवून लेखी आश्वासन दिले होते. परंतु या आश्वासनाची पुर्तता झाली नसल्यामुळे शिकाऊ उमेदवार व कंत्राटी कामगार निराश झाले असून त्यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
दिलेल्या निवेदनात असोसिएशनने विविध मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये, महावितरण, महापारेषण, महानिर्मीती कंपनीमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावुन घ्यावे. तसेच महासंकटाच्या कोरोना काळामध्ये केलेल्या कार्याची दखल घेवुन त्यांना सरळ सेवा भरती मध्ये प्राधान्य देण्यात यावे. कंत्राटी कामगारांना रोजंदारी पध्दतीने कामावर घेवुन शाश्वत रोजगारांची हमी दयावी. कंत्राटी कामगारांच्या विद्युत प्राणांतिक/अप्राणांतिक अपघातामुळे नुकसान भरपाई धोरण तयार करण्यात यावे. कंत्राटी कामगारांना कंपनीच्या प्रशासकीय परिपत्रकानुसार वेतन व इतर सुविधा पुरविण्यात याव्या. कंत्राटी कामगारांना वैयक्तिक विमा स्वरूपात २० लाखापर्यंत कवच देण्यात यावे. त्यांच्या कुटुंबाकरीता तीन लाखापर्यत मेडीक्लेम योजना राबविण्यात यावी. कंत्राटी कामगारांना कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नियमित कामगारांप्रमाणे सुविधा पुरविण्यात याव्या. शिकाऊ उमेदवारांसाठी प्रसिध्द करण्यात आलेल्या विद्युत सहायक व उपकेंद्र सहायक भरती प्रक्रीया त्वरीत राबविण्यात यावी. मराठा आरक्षण धोरणानुसार ईएसबीसी प्रवर्गासाठी रिक्त असलेल्या ४६९ जागेसाठी नियुक्ती देण्यात यावे. भरती प्रक्रीयेमध्ये घोषित केलेल्या २५ टक्के शिकाऊ उमेदवार वाढीव आरक्षणाची अमलबजावणी करण्यात यावी. वयोमर्यादा वाढीबाबत त्वरीत सुधारणा करून वयोमर्यादा वाढविण्यात यावी. तिन्ही कंपनीतील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील रिक्त पदाचा अनुशेष सरळ सेवा भरती प्रकीया पुर्ण करून भरण्यात यावा. शिकाऊ उमदेवार संस्थेला प्राधान्याने तिन्ही कंपनीमधील कामे देण्यात यावे. राज्यातील कंत्राटी कामगार व शिकाऊ उमेदवारांमध्ये वाढता असंतोष विचारात घेवुन तातडीने प्रलंबित असलेले व आश्वासित केलले प्रश्न सोडविण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी या मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
शिकाऊ उमेदवार व तांत्रिक कामगारांच्या हिताच्या मागण्यांवर शासनाने योग्य विचार न झाल्यास तांत्रिक अप्रेंटीस कंत्राटी कामगार असोसिएशन राज्य अध्यक्ष प्रभाकर लहाने तीव्र आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल व त्यानंतर होणार्‍या परिणामाची जबाबदारी शासन, प्रशासनावर राहील. असा इशारा देण्यात आला आहे. प्रशांत ननोरे,किरण राऊत,मनिष धारस परमानंद बनगया, जिल्हा अध्यक्ष विक्की कावळे,कुणाल जिचकार,प्रतिक रेवतकर , दिनेश काळे,रवि कांबळे व पद अधिकारी उपस्थित होते
निवेदनाच्या प्रतीलिपी उर्जा विभागाचे प्रधान सचिव, महावितरणचे कार्यकारी संचालक, महानिर्मितीचे मुख्य महाव्यवस्थापक आदींना देण्यात आल्या आहेत.

तांत्रिक अप्रेन्टीस व कंत्राटी कामगार अशोसिएशन यांच्या वतीने नागपूर जिल्हा अधिकारी मा. रविंद्र ठाकरे साहेब यांना शिकाऊ उमेदवार व कंत्राटी कामगार यांच्या प्रलंबित प्रश्ना बाबत निवेदन देण्यात येणार आहे यावेळी उपस्थित जिल्हा संपर्कप्रमुख मनिष धारम जिल्हा अध्यक्ष विक्की कावळे व पद अधिकारी उपस्थित होते

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …