*कोवीड़ 19 च्या रोकथाम करीता निरंतर सर्वे चा तीसरे चरण* *विभागीय आयुक्त नागपूर यांचे दिशानिर्देश व मार्गदर्शनात स्थानिक प्रशासन सज्ज*

*कोवीड़ 19 च्या रोकथाम करीता निरंतर सर्वे चा तीसरे चरण*

*विभागीय आयुक्त नागपूर यांचे दिशानिर्देश व मार्गदर्शनात स्थानिक प्रशासन सज्ज*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*


*मुख्याधिकारी रविंद्र भेलावे,वरिष्ठ चिकित्सक डॉ सेंबेकर, डॉ संदीप गुजर यांनी केले मार्गदर्शन*

सावनेरकोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केन्द्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनात संपूर्ण देशात स्थानिक प्रशासनाने लाँकडाऊन चे चार चरण पुर्ण करुन सध्या स्थितीत सुरु असलेले पाचवे चरण म्हणजेच अँनलाँक 01*


*लाँकडाऊन च्या तीसर्या,चवथ्या व अनलाँक च्या पहिल्या चरणात नागरिकांना दळणवळणासह काही प्रमाणात व्यवसाईक प्रतिष्ठाने उघडली गेल्याने अथवा नियमावलीत शिथलता आनल्याचा फटका आता शहरी भागासोबतच ग्रामीण भागातून बाढते रुग्ण प्रशासकीय स्तरावर चिंतेचा विषय बनला आहे व त्यावर उपाययोजना आखणीला सुरुवात झाली असुन मा.विभागीय आयुक्त यांच्या दिशानिर्देशानुसार सावनेर नगर पालिका व प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वतीने “निरंतर सर्वे” दि.16 जुन पासुन पुढील अनिश्चित काळा करिता सुरु करण्याकरिता सहभागी होणाऱ्या शिक्षकांना दि.15 जुन रोजी प्रशिक्षण देण्यात आले.*


*यात प्रशिक्षण शिबीराचे प्रास्ताविकातुन सावनेर नगर पालिकेचे मुख्याधिकारी रविंद्र भेलावे यांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करत निरंतर सर्वे विषयी महीती देत प्रत्येक शिक्षकांनी आपल्याला मीळालेले क्षेत्र व त्यातील नागरिकांचा वाँटसप गु्प तयार करावे जेनेकरुण त्यामाध्यमातून नागरीकांशी जवळीक साधत त्यांचे जवळून आरोग्य विषयक माहीती गोळा करणे सोइचे जाईल असे मत व्यक्त केले*


*तर प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे वरिष्ठ चिकित्सक डॉ भुषन सेंबेकर, डॉ संदिप गुजर,डॉ. अक्षय दिक्षित, डॉ. हर्ष गंटावार आदिंनी नागरिकांचा सर्वे करतांना कोणत्या आरोग्य विषयक माहीती,त्यांची प्रवास माहिती व त्यांना कोरोना विषाणूंना पोषक असलेल्या ताप,सर्दी,पडसे,खोकला सोबतच त्यांना असलेले श्वसनाचे विकार,रक्तचाप,रक्तशर्करा, हु्दया संबंधित संपूर्ण माहीती गोळा करणे आदिंची सविस्तर माहीती देत सर्वेक्षणा दरम्यान कुणीही संशयित रुग्ण आढळल्यास त्याला प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे येण्याची अथवा आणन्याकरिता आरोग्य अधिकारी यांच्याकडे संपर्क साधन्याचे दिशानिर्देश याप्रसंगी देण्यात आले*


*सकाळी 1-30 ते 12-30 व 12 -30 ते 1-30 अश्या दोन चरणात पार पडलेल्या सदर शिबिरात जवळपास 119 शिक्षक शिक्षिकेंनी भाग घेऊण “निऱतर सर्वे” संबंधित सुत्र जानुन घेतले*

*प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वितेकरिता नगर पालिका सावनेर चे श्री.बुधे,नितीन चाचारकर,शिक्षक गजानन पटले,पडलवार,मेंढे मँडम,मदनकर कु.राही बागडे,राकेश चोरे,आकाश नाईक,मोनू मछले आदिंनी परिश्रम घेतले*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …