Breaking News

*गृहमंञी अनिल देशमुख यांची विभागिय आयुक्त कार्यालय येथे आढावा सभा*

*गृहमंञी अनिल देशमुख यांची विभागिय आयुक्त कार्यालय येथे आढावा सभा*

 

विशेष प्रतिनिधि- ललित कनोजे

नागपुर दि. १५/०६/२०२० रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे महाराष्ट्र राज्य गृहमंत्री मा.श्री. अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा सभा घेण्यात आली. त्यात वाळू घाटाचे लिलाव, मोठ्या प्रमाणात होणारी वाळूची चोरी कशा पद्धतीने थांबवता येईल व घरकुलच्या लाभार्त्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय अमलात आणावा, WCL ची वाळू घरकुलच्या लाभार्त्यांना द्यावी व शासकीय प्रकल्पासाठी वाळू राखून ठेवावी अशा विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत जी, चंद्रपुर व गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जी, रामटेकचे अामदार अॅड. आशिष जयस्वाल , विभागीय आयुक्त, नागपूर डॉ. संजीव कुमार, नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, नागपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नागपूरचे पोलीस आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प नागपूर योगेश कुंभेजकर उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …