Breaking News

*सहाय्यक पोलीस निरीक्षकास लाच स्विकारतांना अटक* *लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर ची मोठी कारवाई*

*सहाय्यक पोलीस निरीक्षकास लाच स्विकारतांना अटक*


*लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर ची मोठी कारवाई*


वरोरा प्रतिनिधी – मुजम्मील शेख सोबत जुबेर शेख
*वरोरा पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश खाडे यांना लाचलुचपत विभागाकडून दहा हजार रुपयाची रोख रक्कम स्वीकारताना अटक झाल्याने उडाली खळबळ*

*प्राप्त महितीनूसार तक्रारर्ता चंद्रपूर येथील रहिवासी असून मागील दोन दिवसापासून सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खाडे खोट्या गुन्ह्यात फसविण्याची भीती दाखवत पैशाची मागणी सतत करत होते. फिर्यादी आपल्या गाडीने चंद्रपूर वरून नागपूरला जात असताना वरोरा येथे अपघात केल्याच्या कारणावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांनी अडवले त्यानंतर पैशाची मागणी करून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर फिर्यादी रुग्णवाहिका चालकाने मंगळवारी वरोरा येथील बोर्ड चौकामध्ये दहा हजार रुपये देण्याचे ठरले होते. परंतु फिर्यादीला या लाचखोर अधिकाऱ्याला खोट्या आरोपाखाली पैसे देण्याची इच्छा नव्हती. त्यांनी लाचलुचपत विभाग चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधून घडत असलेला प्रकार सांगितला. त्यानंतर लाचलुचपत विभागाने गुप्त टीम तयार करून लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांस रंगेहात दहा हजार रुपये रोख रक्कम स्विकारतांना बोर्ड चौक येथे अटक करण्यात आली.*

 

*लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधिक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली ढाले,अजय बागेसर, पोका. रविकुमार ढेंगळे, रोशन चांदेकर, वैभव गाडगे, व चालक दाभाडे आदिंनी कारवाई भाग घेतला*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …