Breaking News

*भेंडवी येथिल संतोष सलाम ह्यांच्या शेतात मजुरी करण्यास गेलेल्या सुनंदा सुधाकर बावणेवर विज पडल्याने जागीच मृत्यू *

भेंडवी येथिल संतोष सलाम ह्यांच्या शेतात मजुरी करण्यास गेलेल्या सुनंदा सुधाकर बावणेवर विज पडल्याने जागीच मृत्यू 

 

कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे

गडचांदूरपावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने शेतात पेरण्या सुरु झाल्या आहेत. भेंडवी येथिल संतोष आलाम ह्यांच्या शेतातही कापूस टीबण्याचे काम सुरू झाले आहे. कामासाठी शेत मालकाने गडचांदूर येथिल मजूर कामाला आणले होते. ह्या कामासाठी गडचांदूर येथिल वॉर्ड क्रमांक 7 मधे वास्तव्यास असणारी महिला सुनंदा सुधाकर बावणे वय 44 वर्ष काम करत असताना विज कोसळल्याने जागीच मृत्युमुखी पडली.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार डॉ. रविन्द्र होळी घटनास्थळी रवाना झाले असुन पंचनामा तसेच इतर शासकीय कारवाई सुरू आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …