Breaking News

*आरोग्य सेविकाची विविध मागणी* *माजी सभापती चिखले यांना निवेदन*

*आरोग्य सेविकाची विविध मागणी*

*माजी सभापती चिखले यांना निवेदन*

 नरखेड़ प्रतिनिधी -श्रीकांत मालधुरे

नरखेड़आज जगावर व भारतावर कोरोना या आजाराने सर्व मानव जाती वर भंयाकर मुत्यूचे संकट निर्माण झाले आहे.पण या संकटाच्या सामना आपल्या जिव मुठीत घेऊन प्रथम कोरोना योद्धा आरोग्य कर्मचारी म्हणून ज्यांना संबोधले जाते त्यांना अनेक समस्या समोर जावे लागते ही खूप लाजी वाणी बाब आहे.

दि.15/06/2020 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समिती नागपूर
च्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन नागपूर जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती चंद्रशेखर चिखले यांना देण्यात आले .त्यांच्या निवेदनात प्रमुख मागणी म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील अधिकारी व कर्मचारी यांना शासन सेवेत नियमित करण्याबाबत असुन त्यांनी दि.11/06/2020 पासून कामबंद आंदोलन सुरु केल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे.याप्रकरणी आपण स्वतः लक्ष घालून राज्याचे गृहमंत्री मा. ना.अनिलबाबु देशमुख व आरोग्य मंत्री मा.ना.राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधुन संबंधित विषयावर तोडगा काढण्याची विनंती करणार असल्याचे आश्वासन चंद्रशेखर चिखले यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.यावेळी शिष्टमंडळात रुपाली तिडके ,मेवी जोसेफ,संगीता राऊत,ललिता कन्हेरकर,ज्योती पाटील उपस्थित होत्या.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …