Breaking News

*संतोष वाटेकर हत्ये प्रकरणी एक संशयीत ताब्यात पोलीस रिपोर्ट* *संतोष वाटेकर हत्ये प्रकरणी एक संशयीत ताब्यात* *चंद्रपूर गुन्हे शोध पथकाची कारवाई*

*संतोष वाटेकर हत्ये प्रकरणी एक संशयीत
ताब्यात पोलीस रिपोर्ट*

*संतोष वाटेकर हत्ये प्रकरणी एक संशयीत ताब्यात*

*चंद्रपूर गुन्हे शोध पथकाची कारवाई*

 

विशेष प्रतिनिधि- गौतम धोटे

कोरपना :- यवतमळ जिल्ह्यातील वणी स्टेट बॅकेच्या एटीएम मध्ये पैसे भरण्याचे काम करीत असलेल्या वणी येथील तरुणाचा चंद्रपुर जिल्हयातील गडचांदुर परिसरातील जंगलात दि. 29 फेब्रुवारीला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळुन आला होता. गडचांदुर पोलीसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास गुन्हे शोध पथकाकडे देण्यात आला होता. तब्बल शंभर दिवसांनी पोलीसांनी दि. 17 जुन ला वणी येथुन एका बिअर बार मालकाला संशयीत म्हणुन ताब्यात घेतले आहे.

विठठलवाडी येथील रहिवाशी असलेला मृतक संतोष वाटेकर हा मागील अनेक वर्षापासुन ईपीएस लाॅजी कॅश सोलुशन प्रा. लिमिटेड नागपूर या कंपनीच्या माध्यमातुन स्टेट बॅकेच्या एटीएम मध्ये रक्कम भरण्याचे काम करीत होता. दि. 20 फेब्रुवारीला स्टेट बॅकेतुन रक्कम घेवुन तो एटीएम मध्ये भरण्याकरीता निघाला होता तेव्हा पासुनच तो बेपत्ता झाला. वणी येथे या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता मात्र त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. दि. 29 फेब्रुवारीला चंद्रपुर जिल्हयातील गडचांदुर परिसरातील जंगलात त्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळुन आला होता.

    याप्रकरणी गडचांदुर पोलीसांनी खुनाचा गुन्हा नोंद करुन तपास चंद्रपुर गुन्हे शोध पथकाकडे सोपवला असता या पथकाने वणी येथे तब्बल दोन दिवस तळ ठोकून अनेकांची चैकशी केली मात्र कोणताही सुगावा लागत नसल्याने तपास थंड बस्त्यात होता. दि. 17 जुन चंद्रपुर येथील स्थानिक गुन्हे शोध पथकाने निळापुर मार्गावर असलेल्या बार मालक लखन लक्ष्मण नक्षीने संशयीत म्हणुन ताब्यात घेतले आहे. त्याला गडचांदुर पोलीसांनी कोरपना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे .हे विशेष

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …