Breaking News

*पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची अरविंद बनसोड च्या परिवाराला दिली भेट*

*पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची अरविंद बनसोड च्या परिवाराला दिली भेट*

आरोपीवर 302 दाखल करण्याची परिवाराची मागणी.

 कठोर कार्यवाही करण्याचे दिले पोलिसांना निर्देश.
 पीडित परिवाराच्या दुःखात मी सहभागी असल्याचे नितीन राऊत म्हणाले.
मृत अरविंद बनसोड च्या फोटोला केली मानवंदना.
पीडित कुटुंबाला मिळणार पूर्ण पने न्याय.

प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे व सोबत जलालखेडा वरून पवन कळंबे

जलालखेडा- पिंपळधरा येथील अरविंद बनसोड आत्महत्ते प्रकरण राज्यात नव्हे ते पूर्ण देशात मोठ्या प्रमाणत गाजत आहे. त्याच पार्शभुमीवर राज्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी बुधवारी दुपारी १ वाजता अरविंद बनसोड च्या परिवाराची त्यांच्या घरी पिंपळधरा येथे जाऊन भेट घेतली व त्यांची सांत्वना केली. त्याच्या परिवाराची झालेल्या घटनेबद्दल चर्चा केली व तुम्ही घाबरु नका मी तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास दिला. तसेच पीडित परिवाराला सर्व तोपरी मदत करण्याचे दिले आश्वासन. पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करावी व कसलीही हयगय करू नये असे निर्देश दिले तसेच काही अडचण असल्यास सरळ माझ्याशी संपर्क करा असे या पीडित परिवाराला सांगितले.पालकमंत्री यांनी या वेळी अरविंद बनसोड च्या फोटोला मानवंदना केली या वेळी पालक मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या सोबत माजी आमदार आशीष देशमुख, जिल्हा परिषद सदस्य प्रीतम कवरे, दिलीप हीवरकर, दिनकर राऊत, पोलिस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय अधिकारी काटोल श्रीकांत उंबरकर, पोलिस उपविभागीय अधिकारी नागेश जाधव, तहसीलदार हरिष गाडे, जलालखेडा येथील ठाणेदार दीपक डेकाटे, शरद जुडपे, राजीव पोतदार, प्रभाकर बानाईत, कुलदीप हिवरकर, पत्रकार योगेश चौरे, रामचंद्र लिखार व इतर काही अधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …