*शरीराला कोणत्याही आजारापासून वाचविण्यासाठी योगाभ्यास आवश्यक :

डॉ.शरयू तायवाडे*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
कोराडी:- आज कोव्हीड 19 – कोरोणा व्हायरस च्या काळात व्यक्ती बंदिस्त झाला आहे.शरीराचा स्थूलपणा वाढला आहे.व्यक्तीने शरीराकडे दुर्लक्ष केले आहे.व्यायाम होत नसून शरीरांमध्ये अनेक आजारांनी प्रवेश केला आहे.म्हनूण व्यक्तीने आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे योगाभ्यास करण्यासाठी कोणतेही मूल्य मोजावे लागत नाही.म्हणून आज प्रत्येकाने वेळ न घालवता योगाअभ्यास केला पाहिजे,असे मत प्राचार्य डॉ शरयू तायवाडे यांनी व्यक्त केले.
तायवाडे महाविद्यालय महादूला-कोराडी,प्रीयदर्शनी महीला महाविद्यालय वर्धा,एस.एम.डी .कॉलेज गोंदिया,नबीरा महाविद्यालय काटोल,एम.बी.पटेल कॉलेज साकोली,एस. एस.गर्ल्स कॉलेज गोंदिया,एन.पी.वाघाये कॉलेज लाखनी यांच्या सयुक्त विद्यमाने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय योग दिवस समारोह आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने करण्यात आली. यानंतर प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे (तायवाडे महाविद्यालय महादूला),प्राचार्य रंभा सोनाये (प्रियदर्शनी महिला महाविद्यालय वर्धा),प्राचार्य रंजना चतुर्वेदी(एन.एम.डी कॉलेज,गोंदिया) या सर्वांनी योगसबंधी आपले मत व्यक्त केले.

यानंतर प्रियदर्शनी महिला महाविद्यालय,वर्धा येथील विद्यार्थ्यानी प्रार्थना व सुक्ष्म व्यायाम संबधी प्रात्याक्षिक करून दाखविले ,तर
नबीरा महाविद्यालय काटोल येथील विद्यार्थ्यानी आसन,प्राणायम व शांतीपाठ यासंबधी प्रात्याक्षिक करून दाखविले.यानंतर पून्हा प्राचार्य डॉ.सुनिल कूमार नविन (नबीरा महाविद्यालय काटोल), प्राचार्य हरिष त्रिवेदी (एम.बी.पटेल कॉलेज साकोली) ,प्राचार्य निलू बाहेकर (एस.एस.गर्ल्स कॉलेज गोंदिया) ,डॉ.डी.एस. कडव (वाघाये कॉलेज साकोली) यांनी योग व त्याची आवश्यकता यासंबधी आपले मत व्यक्त केले.आॅनलाईन झूम अॅप वर या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमित टेंभुर्णे यांनी , प्रास्ताविक डॉ.सोनाली शिरभाते यांनी ,पाहुण्यांचा परिचय डॉ.प्रविनकूमार यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.सूनिल भोतमांगे यांनी मानले. या आॅनलाईन कार्यक्रमात जवळ जवळ ३०० प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
Maharashtra News Media सच की आवाज