*सहावे आंतरराष्ट्रीय योगदिन समारंभ संपन्न*

*सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन*
उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे
मौदा : मौदा येथिल पतंजली योग समिती तालुका व्दारा दि. २१ जुन रोजी रविवारला सकाळी सहावा “आंतरराष्ट्रीय योग दिवस” उत्साहाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन भारत स्वाभिमान ट्रस्ट तालुका मौदा चे प्रभारी देवेन्द्र सोनटक्के यांनी केले. आयुष मंत्रालय भारत सरकार व्दारा प्रेषित “प्रोटोकॉल”नुसार संचालीत करून विश्व योग दिवसाची माहिती देण्यात आली. याप्रसंगी महिला पतंजली सहप्रभारी शिला तुरनकर यांनी योगवर्गाचे संचालन केले. विविध योगाभ्यास सराव व प्राणायाम करुन योगाचे फायदे सांगण्यात आले.
पतंजली योग समिती चे महामंत्री दिनेश ढोबळे यांनी स्वदेशी वस्तूंच्या वापर व विदेशी वस्तूंचा बहिष्कार करावा याबाबत मार्गदर्शन केले. पतंजली योग समितीचे प्रभारी डॉ. सुनिल बोरकर यांनी कोरोना आपत्तीत शारीरिक प्रतिकार शक्ती वाढवून रोगांना दुर ठेवण्यासाठी माहिती दिली. व आयुर्वेदीक काढा प्रक्रिया सांगितले. आभार प्रदर्शन युवा भारतचे प्रभारी ईश्वर पत्रे यांनी केले. योग शिक्षिका मनिषा राकेश, ऋतूजा भुरे व ज्योती मस्के, किसानसेवा समितीचे प्रभारी नरेन्द्र बाळबुधे, कोषाध्यक्ष सुनिल ठाकरे, प्रकाश पांढरे, एकनाथ कापगते, नंदकीशोर कनोजे, निरंजन केळकर, विनोद मोहोड, राजकुमार दिमदे, गुलाब तुरनकर व तुकाराम लुटे इत्यादी योगशिक्षकांनी आसनांचे प्रात्यक्षिके करुन दाखविले.
त्यानंतर सर्वांना आयुर्वेदीक काढा वितरण करण्यात आले. संपूर्ण देशात कोवीड़-१९ चे विषाणूच्या प्रभावामुळे “योगा अँट होम” नुसार घरात परिवारा सोबत किंवा कमीतकमी लोकांच्या उपस्थितीत वीश्व योग दीवस साजरा करण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंन्द्र मोदी तथा योग ऋषी परमपूज्य स्वामी रामदेव महाराज व्दारा करण्यात आले. पतंजलि योग समिती मौदा चे सर्व पदाधिकारी यांनी सोशल डिस्टंन्सींगचे पालन करून उत्साहाने कार्यक्रम पार पडला. संपुर्ण देश रोगमुक्त और स्वस्थ राहो अशी प्रार्थना करुन कोरोना संकटात ज्यांना आपले प्राण गमवावे लागले त्यांना श्रद्धांजलि देण्यात आली. तसेच सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपन्न झाला.
Maharashtra News Media सच की आवाज