*लवकुश नगर येथे अंतर्राष्ट्रीय योग दिन साजरा*
*पतंजली योग समितीचे आयोजन*
विशेष प्रतिनिधि
*नागपूूर– सहाव्या अंतर्राष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन पतंजलि योग समिती तसेच देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या आव्हानानुसार आज अंतर्राष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.*

*कोरोना संसर्गजन्य परिस्थिती वर मात करण्याकरिता स्थानिक प्रशासन व शासनाने दर्शवलेल्या नियमांचे पालन करून, मास्क तसेच सॅनिटायझर चा वापर करून अंतर्राष्ट्रीय योग दिवस उत्साहात। साजरा करण्यात आला.*

*यावेळी विभाग प्रमुख सुदामजी गाढवे आणि मिडिया प्रभारी जोत्सना इंगळे यांनी योग व विश्व योग दिनाचे महत्त्व पटवून सांगत उपस्थितांकडून प्रात्यक्षिक करवून घेतले.याप्रसंगी माधुरी ताई ठाकरे यांनी मार्गदर्शन केले तसेच कविता गाढवे, किरण डांगरे, दुर्गा डुंबरे, संजय पाटील, राजेश डांगरे, हरिशचंद्र वैद्य , नामदेव बनकर, जितेंद्र इंगळे, प्रतिक्षा, तनुजा, फाल्गुनी इंगळे इत्यादींनी प्रत्यक्ष योग सादरीकरणात सहभाग घेतला.*
Maharashtra News Media सच की आवाज