Breaking News

*योगश्च चित्तरुपेन* *आरोग्य विषयक चर्चा*-दिपक ना. येवले (नागपुर )

*योगश्च चित्तरुपेन*

*आरोग्य विषयक चर्चा*-दिपक ना. येवले (नागपुर )

विशेष प्रतिनिधि


नागपुरमागच्या लेखांमध्ये आपण सहावा आंतरराष्ट्रीय योग दिन, याबद्दल माहिती पाहिली होती. आता क्रमशः आपल्याला प्राणायाम बद्दलची माहिती पाहची आहे.

तत्पूर्वी मी तुम्हाला माझा परिचय देतो. मी एक चार-चौघांसारखा साधारण व्यक्ती आहे. मी काही खूप विद्वान नाही. माझा अक्षता मार्केटिंग या नावाने व्यवसाय आहे. मी ग्रोप्योर मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडमीटेड या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. मी नागपूर जिल्हा पतंजली समितीचा कोषाध्यक्ष आहे .सन 2003मध्ये, आदरणीय प्रातःस्मरणीय योग गुरु स्वामी रामदेव बाबा यांनी नागपूरमध्ये कळमना येथे शिबिर घेण्यासाठी आले होते. त्यावेळेस मी ते शिबिर अटेंड केले होते. त्या महत्वपूर्ण शिबिरामध्ये मला प्राणायामाचे महत्व समजले. त्यावेळेस मला वेग वेगळ्या प्रकारचे खूप आजार होते. नेहमी वेगवेगळ्या प्याथीच्या डॉक्टरांकडे जाऊन, औषधोपचार घेत होतो. औषधोपचार घेत असताना मला ॲलोपॅथी औषधापासून एक वेगळाच त्रास जाणवायला लागला, म्हणजे औषध बरे होण्या साठी घेतले जात असे, परंतु त्याच औषधापासून त्रास व्हायला लागला, तर काय उपयोग? मग अचानक मला शुगरचा त्रास झाला. आणि मी रामनगरच्या डॉक्टर अनिल नांदेडकर सरांकडे गेलो, त्यांना माझा त्रास सांगितला व त्यांनी मला प्राणायाम करण्यास प्रवृत्त केले. त्यांनी आपल्या वर्गामध्ये नियमित यायचे मला सांगितलं. मी कुठल्याही प्रकारचे औषध न घेता फक्त प्राणायामाने माझ्या निरनिराळ्या प्रकारच्या व्याधी बऱ्या व्हायला लागल्या. सोबत काही आयुर्वेद औषधेही घेत होतो. पावणे दोन वर्षात माझ्या असे लक्षात आले की फक्त रोज प्राणायाम केल्यामुळे माझ्या शरीरा मध्ये असलेले निरनिराळे रोग बरे होत आहे.

मी मनाशी ठरवले की, आता योग विद्या आपण शिकून, जसा आपल्याला फायदा झाला. तसाच फायदा प्रत्येक व्यक्तीला व्हायला पाहिजे असा निर्धार केला. मी 2005 साली हरिद्वारला परमपूज्य प्रातःस्मरणीय योग गुरु स्वामी रामदेव बाबा यांच्या सानिध्या मध्ये त्यांच्याकडून प्राणायामाचे धडे शिकलो. त्यांनी योगाबद्दल काही पुस्तके दिली. त्या पुस्तकांमधून अभ्यास करून बरेच ज्ञान मिळवले. मी मनाशी ठरवले की आपण कुणालाही पैशांनी किंवा इतर कुठल्याही परीने मदत करू शकत नाही. पूजनीय स्वामी रामदेव जी नी आम्हाला सांगितले की, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तो पर्यंत तुम्हाला, आपल्या आयुष्याचे रोज सकाळी दोन तास प्राणायाम शिकवण्यासाठी द्यायचे आहे. संस्थेचे कुठलेही काम तुमच्या वाट्याला जे येईल ते तुम्हाला करायचे आहे. हा संकल्प मनात होता. आणि नागपूर येथे 25 ऑक्टोबर 2005 साला पासून प्राणायामाचा सार्वजनिक वर्ग घ्यावयास सुरुवात केली. त्यावेळेस आम्ही फक्त दोन लोक, त्या बगिच्यात प्राणायाम करत बसायचं. लोक आम्हाला पाहून हसायचे की हे काय प्रकार करत आहे. मग जे लोक आम्हाला विचारायला येत होते, त्यांना प्राणायामाचे महत्त्व पटवून देत होतो, व हळूहळू प्राणायामाचा प्रचार प्रसार झाला. या योग गंगेत लोक जूडत गेले व आज नागपूर शहरांमध्ये अकराशे च्या वर प्राणायामाचे वर्ग वेगवेगळ्या गार्डनमध्ये, देवळात, मंगल कार्यालय, मध्ये अशा सार्वजनिक ठिकाणी सुरू आहे. आत्ता कोरोनामुळे सगळे साधक आपापल्या घरी रोज नियमित प्राणायाम करतात. हजारो लोक प्राणायाम केल्यामुळे अनेक व्याधींपासून मुक्त झाले व रोज प्राणायाम करून आपण सर्वच पुढील लेखापासून स्वस्थ व निरोगी राहूया.
*भाग (2) पुढील लेखात क्रमशः*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …