Breaking News

*नाफेडला चना विकण्यासाठी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये करावी लागते कसरत* *ग्रेडर पुजल्या शिवाय चना खरेदी होत नसल्याचा आरोप* *कु्षी उत्पन्न बाजार समिती सभापतींनी घेतली दखल*

*नाफेडला चना विकण्यासाठी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये करावी लागते कसरत*

*ग्रेडर पुजल्या शिवाय चना खरेदी होत नसल्याचा आरोप*

*कु्षी उत्पन्न बाजार समिती सभापतींनी घेतली दखल*

वरोरा प्रतिनिधि _जुबेर शेख
वरोरः नाफेडच्या वतीने वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा हमीभावाने चना खरेदी केल्या जात आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपले कामे सोडून चना विक्रीसाठी आणला आहे. नाफेड कडील वरोरा केंद्रावर चना आणल्या नंतर सकाळपासून लाईन मध्ये गाड्या लावून चना विक्रीसाठी शेतकरी ताटकळत वाट पाहत आहेत. यानंतर एखाद्या शेतकऱ्याचा नंबर आल्यानंतर ग्रेडर द्वारे चना खराब असल्याची बतावणी करून शेतकऱ्यांना वापस केल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कंटाळून या ग्रेडरच्या विरुद्ध आज बंड पुकारल्यामूळे काही काळ चना खरेदी केंद्र बंद राहिले.
नाफेडचा ग्रेडर रहाणगडाले यांनी शेतकऱ्यांकडून चिरीमिरी पैसे घेण्याच्या गोरख धंदा सुरू केला होता. ज्यांनी ग्रेडर ला पैसे दिले त्यांचा नंबर हा ग्रेडर लवकर लावत होता असे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले यामुळे दिवसभरात कमी गाड्यांचा चना खरेदी होत असल्याने शेतकरी कंटाळून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी या ग्रेडरच्या विरुद्ध बंड पुकारून खरेदी बंद पाडली.ही घटना माहिती होताच सभापती राजू चिकटे तेथे पाहणीसाठी आले. बाजार यार्डमध्ये दोन केंद्रे असून एका केंद्रावर सुरळीत कामकाज सुरू होते. तर दुसरीकडे वारंवार शेतकऱ्यांच्या तक्रारी येत असल्याने सभापती राजू चिकटे यांनी ग्रेडरची कान उघाडणी केली.सभापतींनी शेतकरी व नाफेड मध्ये मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु नाफेड कडून अशा ग्रेडर वर कोणती कारवाई करण्यात येईल याकडे सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …