Breaking News

*कोरोनामुळे रद्द झालेल्या आँर्डरचे पैसे परत करण्यास टाळाटाळ* *डेकोरेशन संचालकांची मनमानी*

*कोरोनामुळे रद्द झालेल्या आँर्डरचे पैसे परत करण्यास टाळाटाळ*

*डेकोरेशन संचालकांची मनमानी*

उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे

मौदा : देशातच नव्हे तर जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे जागची कामे जागीच सोडून घरातच राहण्याचे फर्मान केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सोडण्यात आले. याच दरम्यान ठरलेले विवाह सोहळे सुध्दा रद्द करुन पुढे ढकलण्यात आले.

लग्न समारंभासाठी बुकिंग केलेल्या मंगलकार्यालय, कंँटर्स, घोडा, गाडी, डेकोरेशन, बँड इत्यादी करिता दिलेले ॲडव्हान्स परत करण्यात यावी असाही गाजावाजा सरकार व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. परंतू येथिल काही संचालकांनी घेतलेल्या ॲडव्हाँन्स रकमेत धंदा वाढावा यासाठी नवीन सामान घेतले. आता ॲडव्हाँन्स रुपी घेतलेली रक्कम परत करण्याची वेळ आली तेंव्हा आमचे धंदे पाणी बंद आहेत, पैसे परत कसे करायचे असे उलटसुलट उध्दट पध्दतीने सांगून पैसे परत करण्यास टाळाटाळ करीत आहेत.

असाच प्रकार मौदा तालुक्यातील बाबदेव येथील दिनेश अरुण माने यांच्या बाबतीत घडला आहे. दिनेश चा धाकटा भाऊ गणेश अरुण माने यांचा विवाह दि. ५ एप्रिल २०२० रोजी ठरले होते. त्याकरिता कर्ज घेऊन मंडप डेकोरेशन, चार चाकी वाहन व केटर्स ची व्यवस्था करुन ॲडव्हान्स देऊन बुकिंग केले होती. परंतु देशावर आलेल्या संकटामुळे म्हणजेच कोरोनामुळे विवाह रद्द करावा लागला. यात शासनाने जाहीर केलेल्या निर्देशानुसार चार चाकी वाहने, व कॅटर्स यांनी ॲडव्हान्स परत केले. परंतु कोराड येथिल मंडप डेकोरेशन चे संचालक संजय बावणे ॲडव्हान्स रक्कम परत करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे आरोप दिनेश माने यांनी केला आहे.

याबाबत ची लेखी तक्रार उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व ठाणेदार यांच्याकडे दि. ११ जुन रोजी केली आहे. ॲडव्हान्स रक्कम दहा हजार रुपये परत मिळवून देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया:
ऑर्डर बुकिंगच्या पैशांनी मी नवीन सामान घेतला आहे. त्यामुळे माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक नाहीत. दिवाळीपर्यंत थोडे-थोडे करून देईन.
– संजय बावणे,
प्रो. परमात्मा एक डेकोरेशन,
कोराड, ता. मौदा

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …