Breaking News

*मागील तीन महिन्याचे वीज बिल माफ करा – संग्रामपूर मित्र परिवार* *लोकहितासाठी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांना दिले निवेदन*

*मागील तीन महिन्याचे वीज बिल माफ करा – संग्रामपूर मित्र परिवार*

*लोकहितासाठी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांना दिले निवेदन*

 

बुलढाणा प्रतिनिधि- नंदकिशोर शिरसोले
संग्रामपूरदि.25 जून रोजी संग्रामपूर मित्र परिवाराच्या वतीने मागील तीन महिन्याचे वीज बिल माफ करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेबांना तहसीलदार संग्रामपूर मार्फत निवेदन देण्यात आले.सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रतील सर्व जनता त्रस्त आहे त्यातच लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग , व्यवसाय बंद आहेत अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली त्यामुळे बेरोजगार होऊन फिरत आहेत अशात बिलाचा भार डोईजड होईल त्यामुळे सध्या स्थितीत शेतकरी कामगार नोकरदार वीज बिल भरण्यास असमर्थ आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालालाही लॉकडाऊनमुळे वेळेवर बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने भाजीपाला फळबागांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे मोठी आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत एकीकडे पोटाचा प्रश्न उदभवत असताना दुसऱ्या बाजूला मात्र शेतकरी कामगार नोकरदार व्यापारीवर्ग छोटे मोठे उद्योग शेतकरी यांना वीज देयकबाबत तगादा लावल्यास ही बिले कुठून भरतील सर्वांच्या मनात भीतीदायक जाणवत आहे.

 

शासनाने माफ करावे व कोणाचाही वीज पुरवठा खंडित करू नये अन्यथा लोकशाही पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांना संग्रामपूर मित्र परिवाराच्यावतीने देण्यात आले.निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी बुलडाणा ऊर्जामंत्री ना.नितीन राऊत ,पालकमंत्री ना.रार्जेंद्रजी शिंगणे,आमदार कुठे साहेब, उपकार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.म.संग्रामपूर तसेच ठाणेदार तामगाव पो.स्टे. यांना देण्यात आले. निवेदनावर संग्रामपूर मित्र परिवाराचे शंकर पुरोहित, रवी पहुरकर,राहुल शिरसोले,अनिल वानखडे,हमीद पाशा,अनिस खान, आसिफ खान,वैभव गायकी,कृष्णा घाटे,प्रकाश वेलकर,काशीनाथ तायडे,रामकृष्ण वानखडे,सुरेश राठी,प्रमोद बोदळे, सारंगधर घाटे,दिलीप नांदोकार तसेच संगीतराव सोनोने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …