Breaking News

*वरोरा तालुक्यात 7 नवीन कोरोना रुग्णांची भर जिल्हयात एकूण 72 रुग्ण*

*वरोरा तालुक्यात 7 नवीन कोरोना रुग्णांची भर जिल्हयात एकूण 72 रुग्ण*

वरोरा प्रतिनिधी मूजम्मील शेख

वरोराचंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी  10 कोरोना बधितांची भर पडली आहे . गुरुवारी सायंकाळी आलेले 2 व रात्री उशिरा आलेले 8 असे एकूण दहा बधितांची  भर पडली. अचानक आढळलेल्या कोरोना बधितांमुळे एकूण 72 रुग्ण झालेलं आहे जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार.

वरोरा तालुक्यातील वाघनख या गावातील मुंबई वरून परत आलेल्या व गृह अलगिकरनात असणारे 64 वर्षीय पती व 54 वर्षीय पत्नी 24 तारखेला घेतलेले  नमुने पॉसिटीव्ह आले आहे.वरोरा शहरातील सुभाष नगर वॉर्ड मधील 25 वर्षीय 2 बहिणीचा समावेश आहे ,अभ्यंकर नगर परिसरातील 32 वर्षीय महिला व 37 वर्षीय पुरुष हे हैद्राबाद वरून 22 तारखेला आले होते .22 तारखेपासून गृह अलगिकरनात  होते त्यांचे 24 तारखेला घेण्यात आलेले स्वॅब देखील पॉसिटीव्ह आहे.आरोग्य सेतू अँप च्या माध्यमातून वरोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असणारे 65 वर्षीय व्यक्ती देखील पॉसिटीव्ह ठरले आहे. 

चंद्रपुर मध्ये आता पठाणपुरा भागातील 27 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉसिटीव्ह ,बल्लारपूर येथील कन्नमवार वॉर्ड येथील 28 वर्षीय युवक पॉसिटीव्ह, हैद्राबाद येथून शहरात परतल्याची त्याची नोंद आहे हा युवक 16 जुन  पासून संस्थात्मक 

अलगिकरनात  होता, चंद्रपुर शहरातील बाबूपेठ परिसरातील 27 वर्षीय युवतीचे अहवाल कोरोना पॉसिटीव्ह आला आहे,यवतमाळ येथून 21 जुन येथून परतल्यानंतर ही युवती गृह अलगिकरणात होती

 आता जिल्हयात एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 25 झाली आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …