Breaking News

*योगश्च चित्तरुपेन* *प्रस्तुती दिपक येवले* *(भाग3)*

*योगश्च चित्तरुपेन*

*प्रस्तुती दिपक येवले*

*(भाग3)*

आज चा लेख क्रमांक 3 या भागामध्ये आपण महाराष्ट्र न्युज मीडिया च्या सदरा अंतर्गत प्राणायामाची माहिती पुढील लेख क्रमांक चार वर पाहू.
मागच्या लेखा मध्ये आपण पाहिले की, प्रत्येक मनुष्याला आरोग्यासंबंधी काही तरी समस्या असतेच. ही समस्या निर्माण होण्यासाठी आपल्या शरीराचे तंत्र त्यासाठी जबाबदार असते. आपले शरीर हे एक फार मोठा कारखाना आहे. या कारखान्यात सर्व शरीर रुपी यंत्राची देखरेख म्हणजे (मेन्टेनन्स) व्यवस्थित ठेवला तर आपल्याला कुठल्याही प्रकारची आरोग्य विषयक समस्या राहत नाही. शरीराची काळजी आपल्याला ज्याप्रमाणे, आपण आपल्या वाहनाची काळजी घेतो त्याच प्रमाणे, घ्यावयाची असते. वाहनाची सर्व्हिसिंग वेळेवर करतो त्याला ऑइल बदलायचे असले तर वेळेवर बदलतो, पेट्रोल थोडे कमी असले तर पटकन जाऊन पेट्रोल टाकतो. आपण गाडीची निगा व्यवस्थित राखतो. त्याच प्रमाणे आपल्या शरीराची पण निगा, शरीराला फिट राहण्यासाठी करायला हवी परंतु, आजची स्थिती अशी आहे की आपण आपल्या वाहनाची काळजी घेतो, पण आपल्या शरीराची आपण अजिबात काळजी घेत नाही. ज्यावेळेस आपल्याला खूप जास्त शारीरिक त्रास होतो. त्या वेळेस आपण डॉक्टर कडे जातो. जर एखादा आजार आपल्याला झाला, तर आपण कमीत कमी दोन ते तीन दिवस घरीच वाट पाहतो, की आपला आजार बरा होईल.डॉक्टर कडे चार दिवसानंतर जातो. अशी आपल्या स्वतःच्या शरीराच्या निगराणी ची (मेंटेनन्स) परिस्थितीआहे.पण आजच्या युगामध्ये जे आपले खानपान आहे, ते खूप विचित्र व विरुद्ध प्रकारचे आहे. त्यामुळेच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात.


*आपण काय केले म्हणजे आपल्या शरीराचा त्रास कमी होईल?*
आपण सांसारिक व्यक्ती आहोत. आपण ऋषी किंवा साधू-संन्यासी नाही. त्यामुळे आपण आपल्या जीवन पद्धती नुसारअष्टांगयोग पाहू . तो आपल्या संसारांमध्ये राहून आपणास कसा करता येईल हे प्रथम पाहू व नंतर

आपल्याला परम पूज्य प्रातःस्मरणीय स्वामी रामदेव बाबा यांनी सांगितलेले रोज साठ पॉइंटचे प्राणायाम पॅकेज कसे करायला पाहिजे. व आजच्या युगाचे आयुर्वेद शिरोमणी पूजनीय श्री बाळकृष्ण जी महाराज यांनी जे खानपान व नैसर्गिक वनस्पती आपल्या शरीराला सक्षम बनवण्यासाठी म्हणजे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी वारंवार ते आस्था चैनल व इतर टीव्ही चॅनल वर बऱ्याच गोष्टी सांगत असतात, त्या बद्दलआपण पुढच्या लेख क्रमांक ४ या सदरामध्ये क्रमशः पाहू,

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …