Breaking News

*मौदा नगरपंचायतीला स्वर्ग रथ (शववाहिनी) भेट* *नगराध्यक्षांनी मानले यादव चे आभार* *अखेर बहुप्रतिक्षेला विराम*

*मौदा नगरपंचायतीला स्वर्ग रथ (शववाहिनी) भेट*

*नगराध्यक्षांनी मानले यादव चे आभार*

*अखेर बहुप्रतिक्षेला विराम*

उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे

मौदा : मौदा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शव वाहून नेण्यासाठी शव वाहिनीचे अत्यंत आवश्यकता होती. त्यासाठी नगराध्यक्षा भारती राजु सोमनाथे यांनी रामटेक लोकसभेचे खासदार कृपाल तुमाने यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली. परंतू खासदार तुमाने यांनी आश्वासन देऊनही ते पाळले नाही.

त्याचप्रमाणे मौदा येथिल सामाजिक कार्यकर्ते मनिराम यादव यांची भेट घेऊन शव वाहिनीची मागणी केली असता. सामाजिक कार्यकर्ते मनिराम यादव यांची सामाजिक दायित्व व सेवाकार्य समजून सहा महिन्यांत स्वर्ग रथ (शववाहिनी) ची व्यवस्था करुन दिली. व त्याची मुहूर्तमेढ शुक्रवार दि. २६ जुन रोजी कामठी-मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली. व नगरपंचायतीला हस्तांतरण करण्यात आले. त्याबद्दल नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्षा भारती सोमनथे व मुख्याधिकारी कोमल कराळे यांनी मनिराम यादव यांचे आभार मानले.

स्वर्गीय भातीदेवी लिलाराम यादव व स्वर्गीय महेंद्रसिंग लिलारामजी यादव यांच्या स्मृती पित्यार्थ मनिराम लिलाराम यादव यांचे कडून मौदा नगरपंचायतीला स्वर्ग-रथ (शववाहिका) भेट देण्यात आली. या प्रसंगी उद्घाटक या क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर, मौदा नगराध्यक्षा भारती राजु सोमनाथे, सामाजिक कार्यकर्ते मनिराम यादव, मुख्याधिकारी कोमल कराळे, मौदा न.पं.चे सर्व नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी, तसेच शहरातील गणमान्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …