*नाभिक शाखे कडून विज बिल माफ करणेचे ज्युनियर अभियंताना निवेदन*

नरखेड़ तालुका प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे
मोवाड – कोरोना मुळे नाभिकाचे सलूनची दुकाने ही गेले १००दिवसा पासून बंद आहे.यामध्ये नाभिक बांधवाचे व्यावसायिक मोठे आथिक नुकसान झाले.अशा परिस्थितीत महावितरणने लाँकडाउन संपताच सरसकट तीन महीन्याचे विज देयके ग्राहकांच्या माथी मारले या देयकामुळे ग्राहकांनावर फार मोठ्या कुठाराघात झाला आहे.एकतर सलुनची दुकाने बंद तरीही विज बिल आले.

आता हे विज बिल कसे भरावे काय घर खर्च कसा करावा असे प्रश्न निर्माण झालेत त्यातच विज बिल हे सरासरी विज देयके आँनलाईन पाठविलयानंतर एवढी रक्कम कशी घेतात ?वस्तूत अनेकांनी लाँकडाउनच्या काळात आँनलाँईन पेमेंट केलेले आहे.मग एकदम एकच बिल एवढे मोठे करणे हाच मोठा गोधळ आहे.वस्तूत महावितरणने तीन देयके तयार करून त्याचे प्रमाणे त्याचे वाटप करायला हवे होते.परिणामी नक्कीच त्यातील दाहकता कमी झाली असती .पण महाविरण हि राज्यातील बहुजन जनतेच्या विरोधी असलेल्याने त्यांनी आम्हाला आथिक संकटात टाकले आहे.आम्हचे सलूनची दुकाने बंद असल्याने विज बिल तीन महीनेचे सरसकट माफ करावेत या विषयाचे निवेदन महावितरण चे ज्युनियर इंजिनिअर यांना देण्यात आले.यावेळी पुरूषोत्तम राऊत,विरेंद्र लक्षणे,श्याम जधाव,गोविंद लक्षणे,नरेंद्र जाधव,हे नाभिक पदाधिकारी उपस्थित होते
Maharashtra News Media सच की आवाज