*मौदा येथे आ. गोपीचंद पडळकर यांचा पुतळा जाळून निषेध*
*निदर्शनानंतर राकाँ ग्रामीणचे पोलीस स्टेशनला निवेदन*
उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे
मौदा : नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण च्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांच्या नेतृत्वात आ. गोपीचंद पडळकर यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तत्पूर्वी निदर्शने करून पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
दिनांक २५ व २६ जून रोजी आ. पडळकर यांच्या निषेधार्थ संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी ग्रामीण च्या वतीने आंदोलन करुन पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. राकाँ अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द बोलणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेध नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात करण्यात आला. राकाँच्या सर्व तालुकाध्यक्षांनी आपल्या तालुक्यामध्ये तहसील कार्यालय पुढे निदर्शने करून निषेध नोंदविला. आ. पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर बोलण्यापेक्षा स्वतःचे कार्य पहावे. सलग पाच वेळा निवडणुकीत हरलेला गोपीचंद पडळकर निवडणुकीत कधींच न हरलेल्या खासदार शरद पवार यांच्यावर असभ्य भाषेत टिप्पणी करतो, तेव्हा त्याची लायकी कळते. शरद पवार महाराष्ट्राचे लोकनेते आहेत. एखाद्या पक्षाने फेकलेल्या तुकड्यावर ज्याला आमदारकी मिळाली अशा व्यक्तीने लोकनेते शरद पवार यांच्या बाबत बोलणे म्हणजे निव्वळ आचरटपणा होय.
नागपूर जिल्ह्यातील मौदा, कामठी, उमरेड, रामटेक, पारशिवनी, भिवापूर व काटोल येथे निवेदन देत निदर्शने करण्यात आली. मौदा तालुक्यात जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांच्या नेतृत्वात मौदा तहसील कार्यालय समोर गोपीचंद पडळकर यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. व पोलीस स्टेशन मौदा येथे
त्यांच्या विरोधात कलम ५०५/२ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. यापुढे कोणीही असो त्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस नागपूर जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांनी दिला. याप्रसंगी कामठी विधानसभा अध्यक्ष हरिदास मेश्राम, युवक अध्यक्ष श्याम वाडीभस्मे, डॉ. चंद्रशेखर घोटीपट्टी, शहराध्यक्ष हरिभाऊ कुंभलकर, शहर युवक अध्यक्ष संजू पसारकर, दिलीप सानगडीकर, महिला शहराध्यक्ष मीनाक्षी आस्वले, संगीता जौंजाळकर, अजय पिसे, शुक्कल पांडे, विजय थुल, चेतन मेश्राम, बंडू बागडे यांच्यासह आधी राकाँ पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज