Breaking News

*तीन महिन्याचे वीज देयक सरसकट व शाळा, कॉलेजचे शुल्क माफ करा* *तहसीलदारास निवेदन सादर*

*तीन महिन्याचे वीज देयक सरसकट व शाळा, कॉलेजचे शुल्क माफ करा*

*तहसीलदारास निवेदन सादर*

उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे

मौदा : मार्च, एप्रिल व मे महिन्याचे वीज देयक सरसकट माफ करणे तसेच शाळा महाविद्यालयाचे शुल्क माफ करणे बाबत संपूर्ण देशात कोरोना या महामारी ने देशात थैमान घातलेले असताना या धोरणाच्या प्रादुर्भावामुळे सरकार तर्फे मार्च, एप्रिल व मे महिन्याचे लाँकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात कारखाने व नोकरी, संस्थाने बंद असल्याने कोरोना महामारी च्या काळात सामान्य नागरिकांना आपल्या परिवाराचे पालन-पोषण करणेसुद्धा कठीण झाले आहे. त्यातच आता महावितरण कडून नागरिकांना तीन महिन्याचे सरासरी देयक पाठविण्यात आलेले आहे. सदर देयकाची रक्कम हे मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. तसेच महामारीच्या काळामध्ये खाजगी शाळा व महाविद्यालयाचे संचालकांकडून पालकांना शालेय शुल्क मागण्यात येत आहे.
सरकारचे शुल्क माफी बाबत अद्यापही कुठलेही धोरण नसल्याचे सांगून शाळा-कॉलेज चे संचालक मनमानी करून पाल्याकडून शुल्क वसूल करण्याचे काम करीत आहेत.

तरी मार्च, एप्रिल व मे महिन्याचे वीज देयक सरसकट माफ करण्यात यावे तसेच शाळा कॉलेजचे शुल्क माफ करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन या भागाचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार प्रशांत सांगळे यांच्या मार्फत दि.२६ जुन रोजी देण्यात आले.

निवेदन देताना आमदार टेकचंद सावरकर, मौदा नगराध्यक्षा भारती राजु सोमनाथे, गटनेता मुन्ना चलसानी, नगरसेवक राजु सोमनाथे, राकेश धुर्वे, नगरसेविका सुनिता पाराशर, सुषमा कुंभलकर, वैशाली चौहान, भाजपा मौदा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष शरद भोयर, मौदा शहर अध्यक्ष प्रकाश येळने, महामंत्री रमेश कुंभलकर, शुभम सहारे, राहुल हटवार, व भाजपा पदाधिकारी उपस्तित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …