*अज्ञात चोरट्यांनी देशी दारूचे दुकान जाळले, लाखो रूपयाचा मुद्देमाल खाक*

*मोवाड येथील घटना*
नरखेड़ तालुका प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे
मोवाड– अज्ञात चोरट्यांनी लाकडी बल्लीने लोखंडी खिडकीची सळाख तोडुन आत ज्वलनशील वस्तु फेकल्याने, येथील शासकीय देशी दारूच्या दुकानाला आग लावुन त्यात लाखो रूपयाची देशी दारू व नगदी रक्कम जळुन खाक झाल्याची घटना मोवाड येथे (ता २६) च्या मध्यरात्री घडली. वृत्त लिहीस्तोवर याबाबत मोवाड पोलीस चौकीत घटनेची नोंद व्हायची होती. सवीस्तर वृत्त असे की, मोवाड येथील रहीवाशी आशाबाई रामकीशोर जैस्वाल वय ६५ यांचे वडीलोपार्जीत शासकीय देशी दारूचे दुकान आहे. शासनाच्या विवीध नियमांचे काटेकोरपणे पालन करीत नगरपरीषद हद्दीपासुन पाचशे मीटरच्या बाहेर जाऊन गणेशपूर मार्गावर त्यांनी अर्धा एकर शेत खरेदी करून व तेथे लाखो रूपये खर्च करून दुकानाच्या इमारतीचे प्रशस्त बांधकाम केले. चार पाच वर्षापासुन बंद अवस्थेत असलेला त्यांचा दारू विक्रीचा व्यवसाय कोरोना लाॅकडाऊननंतरच केवळ शासकीय क्षिथीलता म्हणुन सुरू करण्यात आला होता. घटनेच्या दीवशी ता २६ ला सायंकाळी सहा वाजता आपले दुकान बंद करून सौ. जैस्वाल यांचा मुलगा शैलेश व त्यांच्या दुकानातील मजुर घराकडे वळले. दुसर्या दीवशी (ता २७) ला सकाळी दुकान उघडण्याकरीता गेले असता शटर वरून आगीचा धूर निघत असतांना त्यांच्या निदर्शनात आले. दुकान उघडल्याबरोबर आगीचा लोळ त्यांनी बघीतला.

फोन करून मोवाड चौकीतील पोलीसांना तसेच नगरपरीषदेच्या अग्णीशमन यंत्राला बोलावुन आगीवर नियंत्रण मिळवीण्यात यश आले, मात्र तोपर्यंत आतमधील लाखो रूपयाचा माल व नगद तसेच महत्वाचे फर्नीचर जळुन खाक झाले होते. पोलीस सुत्रांनी दीलेल्या माहीती नूसार आग एवढी भयंकर होती की, त्यात देशी दारूच्या बाटल्या २५०० रूपये प्रती पेटीप्रमाणे १३ पेट्या , १८०० रूपये प्रती पेटीप्रमाणे थंड बिअरच्या ६ पेट्या, डीस्प्लेजर फ्रीज ४००० रूपये कीमतीचा , नव्याने बांधण्यात आलेले २०००० हजार रूपयाचे काऊंटर तर त्यातील नगद ८ हजार रूपये असा एकुण १ लक्ष, १७ हजार ८०० रूपयेचा मुद्देमालाआगीत जळून खाक झाला. चोरट्यांनी ईमारतीच्या पश्चिमेकडील लोखंडी खिडकीचा कोंडा तोडुन आत ज्वलनशील वस्तु फेकुन जानून बुजून आग लावली असल्याचा अंदाज पोलीसानी लावला. मात्र वृत्त लिहीस्तोवर पोलीस डायरीत घटनेची नोंद व्हायची होती. पुढील तपास नरखेडचे ठाणेदार मल्लीकार्जुन ईंगळे यांच्या मार्गदर्शनात मोवाड पोलीस चौकीचे पोलीस जमादार शैलेश डोंगरदीवे व नायब पोलीस निलेश खरडे हे करीत आहेत.

Maharashtra News Media सच की आवाज