Breaking News

*कुरखेडा, चामोर्शी तालुक्यात आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह, तिघे कोरोनामुक्त*

*कुरखेडा, चामोर्शी तालुक्यात आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह, तिघे कोरोनामुक्त*

 

गडचिरोली प्रतिनिधी-सूरज कुकुडकर
गडचिरोली : नवी दिल्ली येथून आलेले दोन युवक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. हे युवक कुरखेडा व चामोर्शी तालुक्यातील आहेत. दुसरीकडे आजच मुलचेरा तालुक्यातील तीन महिला कोरोनामुक्त झाल्या आहेत.

नवी दिल्ली येथून जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर दोघांनाही संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. आज त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. आजच मुलचेरा तालुक्यातील तीन महिला कोरोनासंसर्गातून बऱ्या झाल्याने त्यांची दवाखान्यातून सुटी करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ६४ वर पोहचली असून, ४९ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत,तर १४ सक्रिय रुग्णांवर दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …