Breaking News

*खुर्सा येथे पट्टेदार वाघाचा मृत्यू*

*खुर्सा येथे पट्टेदार वाघाचा मृत्यू*

गडचिरोली प्रतिनिधी -सूरज कुकुडकर

गडचिरोली- ता.28: चातगाव वनपरिक्षेत्रांतर्गत खुर्सा(नवेगाव) गावालगतच्या जंगलातील नाल्यात एक पट्टेदार वाघ आज मृतावस्थेत आढळून आला.

जंगलात गेलेल्या गुराख्यांना एक वाघ नाल्यात मृतावस्थेत दिसला. त्यांनी माहिती देताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर उपवनसंरक्षक श्री.कुमारस्वामी, सहायक वनसंरक्षक मुक्ता टेकाळे, चातगावचे प्रभारी वनपरिक्षेत्राधिकारी श्री.मेडेवार हेही कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी गेले. मृत वाघ हा अंदाजे ६ ते ७ वर्षांचा असून, तो नर आहे. वाघाचा चेहरा, खांदे, पाठ व पोटावर नखाने ओरबडल्याच्या व दाताने चावा घेतल्याच्या जखमा होत्या. तसेच त्याचे सर्व अवयवही व्यवस्थित होते. यावरुन दोन वाघांमध्ये झुंज झाल्याने एका वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय दुपारी वाघाच्या डरकाळीचा आवाज ऐकू आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. वाघाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतरच विस्तृत माहिती मिळेल, असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान दोन वाघांच्या झुंजीत एक वाघ जखमी झाल्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी जंगलात जाऊ नये, असे आवाहन वनाधिकाऱ्यांनी केले आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …